Advertisement

सरकारच्या नियम, अटीचं पालन करत मुंबईत गणेशोत्सव साजरा होणार : किशोरी पेडणेकर

राज्य शासनाकडून बृहन्मुंबई महापालिकेला जे दिशानिर्देश प्राप्त झाले आहेत, त्याप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिका गणेश उत्सवाची तयारी कामे करून गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणार असल्याचं किशोरी किशोर पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.

सरकारच्या नियम, अटीचं पालन करत मुंबईत गणेशोत्सव साजरा होणार : किशोरी पेडणेकर
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवर संकट आलं आहे. कोरोनामुळं राज्य सरकारने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, काही नियम व अटी घातल्या आहेत. दरम्यान सरकारनं दिलेल्या अटी आणि शर्तीचं पालन करून मुंबईत गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या पूर्वतयारी बाबत महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी गुगल मीटद्वारे महापालिका गटनेते, मुंबईतील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी तसेच महापालिका प्रशासन, पोलिस, वाहतूक पोलीस यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत राज्य सरकारच्या निर्देशांचं पालन करून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्य शासनाकडून बृहन्मुंबई महापालिकेला जे दिशानिर्देश प्राप्त झाले आहेत, त्याप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिका गणेश उत्सवाची तयारी कामे करून गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणार असल्याचं किशोरी किशोर पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.

बैठकीला आलेल्या विविध पदाधिकार्‍यांनी ज्या काही सूचना केल्या आहेत, त्या सूचनांची नोंद घेऊन यावर्षीच्या गणेशोत्सव आयोजनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करा, त्याचप्रमाणे सीएसआर फंड मधून विविध गणेश मंडळांना ज्या काही जाहिराती मिळतील त्या जाहिराती प्रकाशित करण्याची परवानगी देण्याबाबत महापालिकेने दिशादर्शक नियमावली बनवा आदी सूचनाही पेडणेकर यांनी पालिका प्रशासनाला दिल्या.

काही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे, आर्थिक ताळेबंद सादर करण्यास मुदतवाढ मिळण्याबाबत धर्मादाय आयुक्तांना पत्र लिहिणार असल्याचे महापौरांनी सांगितले. मूर्तिकार संघाच्या प्रश्नांबाबत पदाधिकाऱ्यांनी एक प्रलंबित मागण्यांची यादी सादर करावी. त्यानुसार बैठक आयोजित करून या सर्व प्रश्नांबाबत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गणेशोत्सव काळात करण्यात येणाऱ्या बेस्टच्या वीज पुरवठयांबाबत येत्या आठवड्यात बेस्टच्या महाव्यवस्थापकांसोबत बैठक घेऊन प्रश्न सोडविणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

या बैठकीला उपमहापौर अॅड.सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष (शहर) अॅड. नरेश दहिबावकर, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती (उपनगरे) चे सचिव डॉ. विनोद घोसाळकर, गणेश मूर्तीकार संघाचे अध्यक्ष गजानन तोंडवळकर सह आयुक्त (परिमंडळ -२ ) आदी उपस्थित होते.



हेही वाचा -

मुंबई कोरोनाचे ९९५ नवे रुग्ण, दिवसभरात ६५ जणांचा मृत्यू

गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्याची प्रवाशी संघटनांची मागणी



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा