Advertisement

Ganesh Utsav 2020 : कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटीची 'ही' नवी अट

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शासनाच्या निर्देशानुसार एसटी बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. पण यासाठी एसटीनं काही अटी ठेवल्या आहेत.

Ganesh Utsav 2020 : कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटीची 'ही' नवी अट
SHARES

गणेशोत्सवात अनेक नागरिक कोकणात जातात. गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी एसटीनं आपली सेवा उपलब्ध केली आहे. १३ ते २१ ऑगस्ट दरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शासनाच्या निर्देशानुसार एसटी बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. पण यासाठी एसटीनं काही अटी ठेवल्या आहेत.  

प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशांनी कोविड - 19 ची चाचणी (RT- PCR Swab Test ) करणं अनिवार्य आहे. सदर चाचणी निगेटिव्ह (नकारात्मक ) असल्यास संबंधितांना प्रवास करता येईल, अशी अट ठेवण्यात आली आहे. यासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकावर बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

ई पास नको, पण कोविड टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आणा असा आदेश महामंडळानं काढला आहे. त्यामुळे कोविड-19 च्या टेस्टसाठी चाकरमान्यांना अडीच हजार मोजावे लागणार आहेत. १३ ते २१ ऑगस्ट दरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सदर बसेस सोमवारी रात्रीपासून आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध असतील. आरक्षण केल्यानंतर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशाची कोविड -19 ची चाचणी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आल्यास त्यांना आरक्षण रद्द करता येणार नाही. तसंच प्रवासासाठी स्वतंत्ररित्या ई-पासची आवश्यकता असणार नाही, असं महामंडळाकडून कळवण्यात आलं आहे.

प्रवाशांसाठी एसटी देखील योग्य ती खबरदारी घेत आहे. योग्यरीत्या सॅनिटाईझ केलेल्या बसेस महामंडळानं प्रवासासाठी उपलब्ध केल्या आहेत. कोविड-19 साथीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रवाशांना प्रवासामध्ये सामाजिक अंतर ठेवणं, तोंडाला मास्क बांधणं बंधनकारक करण्यात आलं आहे. प्रवासामध्ये केवळ महामंडळाच्या अधिकृत ठिकाणी नैसर्गिविधी साठी वाहनं थांबवण्याची दक्षता महामंडळानं घेतली आहे.



हेही वाचा

३० सप्टेंबरपर्यंत लोकल, मेल-एक्स्प्रेस सेवा बंद? रेल्वेने केला खुलासा

मुंबई- सावंतवाडी स्पेशल ट्रेन मंगळवारपासून सेवेत

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा