Advertisement

स्थगितीनंतरही आरेत काम सुरू, प्रजापूर पाड्यातील रहिवाशांचा दावा

आरेमध्ये अजूनही मेट्रो कारशेडचं काम सुरू असल्याचं प्रजापूर पाडा इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे.

स्थगितीनंतरही आरेत काम सुरू, प्रजापूर पाड्यातील रहिवाशांचा दावा
SHARES

आरेमध्ये सुरू असलेल्या कामाला सरकारनं स्थगिती दिली. असं असलं तरी आरेमध्ये अजूनही मेट्रो कारशेडचं काम सुरू असल्याचं प्रजापूर पाडा इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे.

आदिवासी कुटुंबांच्या म्हणण्यानुसार, गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) हे काम अजूनही करत आहे. परंतु, कोणतंही बांधकाम सुरू नसल्याचं MMRCL कडून स्पष्ट करण्यात आलं. केवळ सामान उताराचे काम चालू आहे. त्याचा कारशेडच्या कामाशी काही एक संबंध नसल्याचं त्यांनी MMRCL नं म्हटलं आहे.

दरम्यान, रक्षाबंधनाच्या निमित्तानं आदिवासींनी मुंबईतील आरेतल्या झाडांना राख्या बांढल्या. राख्या बांधून वेगळ्या प्रकारे रक्षाबंधन साजरा करण्यात आला. याशिवाय आयुष्यभर पर्यावरणाचं आणि झाडांचं रक्षण करीन असं वचन देखील झाडांना दिलं. खांबाचा पाडा आणि प्रजापूर पाडा इथले रहिवासी आणि आरे संवर्धन समूहाच्या काही सदस्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता.

गेल्या वर्षी, भाजपाची सत्ता असताना, आरे कॉलनीत वृक्षतोड झाली होती. कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मार्गासाठी झाडे तोडल्यामुळे शहरात सर्वांनी याचा विरोध केला होता. मात्र नोव्हेंबरमध्ये सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या कामाला स्थगिती दिली.




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा