Advertisement

राज्यातही ‘तब्लिकी जमात’, पोलिसांच्या निर्णयामुळे कोरोनाचं संकट टळलं

दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या ‘तब्लिकी जमात’ मध्ये सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

राज्यातही ‘तब्लिकी जमात’, पोलिसांच्या निर्णयामुळे कोरोनाचं संकट टळलं
SHARES

 दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या ‘तब्लिकी जमात’ मध्ये सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हजारो लोक यावेळी जमले होते. त्यामुळे देशभर कोरोनाच्या संक्रमणाचा धोका वाढला आहे. अशाच प्रकारचा कार्यक्रम पालघरमध्ये होणार होता. सुरूवातीला पालघर पोलिसांनी त्याला परवानगी दिली होती. मात्र कोरोनाचा धोका वाढल्यानंतर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे तो कार्यक्रम रद्द झाला.  

पोलिसांनी वेळीच निर्णय घेतल्याने हा कार्यक्रम झाला नाही.  या जमातमध्येही विदेशातून अनेक जण सहभागी होणार होते.  मुंबईसह महाराष्ट्रातूनही त्यात शेकडो लोक सहभागी होणार होते. कार्यक्रम  झाला असता तर कोरोनाच्या संकटात आणखी भर पडली असती. दिल्लीत एका चुकीमुळे देशभर कोरोनाचा प्रसार झाला. दिल्लीतल्या जमातमध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांची तपासणी करून त्यांना आता क्वारंटाइन केलं जात आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन परिषदेमुळे भारतातील कोरोनाचा धोका आता अधिकच वाढला आहे. या परिषदेत सहभागी झालेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेलेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. या परिषदेमुळे शेकडो लोकांना या व्हायरसची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकट्या दिल्लीतच तब्बल 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, जे या परिषदेत सहभागी झाले होते.



हेही वाचा -

पीएनबी बनली देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोेठी बँक

कोरोनामुळं पश्चिम रेल्वेला २०७ कोटींचा फटका

गरजूंसाठी सौरव गांगुलीनं दिले २ हजार किलो तांदूळ



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा