हप्तेखोरीत पोलिसच वरचढ, बघा ‘इतकी’ करतात कमाई

भारतात लाच घेतल्याशिवाय कुठले ही काम होत नाही, हे उघड सत्य आहे. यामध्ये विविध गुन्ह्यात इतरांना पकडणारे पोलिसच वरचढ असल्याची आकडेवारी समोर आली आहे. चालू वर्षात लाच स्विकारताना २८ पोलिसांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. त्या खालोखाल महसूल आणि वनविभागत मोठ्या प्रमाात भ्रष्टाचार होत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ठ होत आहे. 

हेही वाचाः-तिसरीतल्या मुलीचे हस्ताक्षर पाहून थक्कच व्हाल, खुद्द जयंत पाटलांनी केलं कौतुक

लाच घेऊ नका, देऊ नका हा संदेश विविध मार्गाने देत जनजागृती करूनही सरकारी खात्यामध्ये लाचखोरीचे प्रमाण काही कमी होत नाही. अवघ्या दोन महिन्यात विविध सरकारी खात्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (अँटी करप्शन ब्युरो किंवा एसीबी) ने ८० सापळे लावले असून १२० जणांना अटक केली आहे. गेल्या वर्षी, २०१९ मध्ये याच कालावधीत ८८ सापळ्यांमध्ये १२२ जणांना अटक करण्यात आली होती. आकडेवारी पाहिली तर ९ % गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असले. तरी महसूल विभागाला मागे टाकून पोलिस विभागात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढलेले असल्याचे निदर्शनास आले आहे. दोन महिन्यात पोलिस दलात १७ गुन्ह्यांमध्ये २८ जणांना  लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तर तर महसूल विभागात ११ गुन्ह्यांमध्ये १५ जणांना पकडण्यात आले आहे. तर वनविभागात ७ गुन्ह्यांची नोंद असून ११ जणांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. तर प्रामाणिक पणाचे धडे शिकवणारे शिक्षक ही यात मागे राहिलेले नाही. शिक्षण विभागात ५ गुन्ह्यांची नोंद असून ७ जणांना पकडण्यात आले आहे. 

हेही वाचाः- ग्रॅण्ट रोड व गोरेगावकरांना 'बेस्ट'चा दिलासा

लाचखोरांविरुद्ध सापळे यशस्वी होण्यात राज्यातील इतर शहरांपेक्षा मुंबईचा क्रमांक सर्वात शेवटचा आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लाचखोरी कमी झालेली नसली तरी लाचखोर सापडण्याच्या संख्येत मात्र कमालीची घट झाल्याचे राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाहीर केलेल्या आकडेवरून आढळून आले आहे. पुण्यामध्ये सर्वाधिक लाचखोर पकडले गेले तर सर्वात कमी लाचखोर मुंबईत आढळले आहेत. सर्वाधिक लाचखोरांना पकडण्यामध्ये पुणे  (२३) आघाडीवर असून त्यापाठोपाठ अमरावती  (१३), ठाणे (१०), नाशिक (९),. नांदेड (९), औरंगबाद (७) आणि नागपूर (५) यांचा क्रमांक लागतो. 

आकडेवारी जानेवारी-फेब्रुवारी २०२० 

परिक्षेत्र           गुन्हे                   आरोपी

मुंबई                         ११

ठाणे            १०            १८

 

पुणे            २३            ३६

 

नाशिक        ९             १३

 

नागपूर                    

 

अमरावती         १३            १९

 

औरंगाबाद                     

 

नांदेड                        

पहिली पाच लाचखोर खाती 

 

खाते                     सापळे         आरोपी

पोलिस                    १७            २८

महसूल, भूमी अभिलेख         ११            १५

वनविभाग                            ११

महानगर पालिका                                 

म.रा.वि.वि.कं. मर्यादीत                    

पुढील बातमी
इतर बातम्या