Advertisement

तिसरीतल्या मुलीचे हस्ताक्षर पाहून थक्कच व्हाल, खुद्द जयंत पाटलांनी केलं कौतुक

स्पर्धेत श्रेयाने ‘शेरास सव्वाशेर’ या विषयावर निबंध लिहिला होता. या स्पर्धेत कु. श्रेया सजन हिने हिचे हस्ताक्षराचे अनेकांनी कौतुक केले.

तिसरीतल्या मुलीचे हस्ताक्षर पाहून थक्कच व्हाल, खुद्द जयंत पाटलांनी केलं कौतुक
SHARES

‘सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना’.. ही म्हण आपण शाळेत असल्यापासून ऐकत आहोत. अशाच एका सुंदर हस्ताक्षर काढणाऱ्या  सोनगावच्या राहोरी तालुक्यातील तिसरीतल्या मुलीचे  हस्तक्षण पाहून केंद्रीय मंत्री जयंत पाटील ही थक्क झाले आहेत.  त्या मुलीच्या सुंदर हस्ताक्षराचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला. हा व्हिडिओे पाहून  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी या मुलीची दखल घेत, तिला पत्र लिहून तिचे कौतुक केले. 

हेही वाचाः- म्हाडा मंडळावरील नियुक्त्या रद्द, भाजप नेत्यांना फटका

अहमदनगरमधील राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत  श्रेयाने ‘शेरास सव्वाशेर’ या विषयावर निबंध लिहिला होता. या स्पर्धेत कु. श्रेया सजन हिने हिचे हस्ताक्षराचे अनेकांनी कौतुक केले. तिच्या या हस्ताक्षराचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला. तो व्हिडिओ जयंत पाटलांपर्यंत पोहचला. तिचे हस्ताक्षर पाहून जयंत पाटील ही थक्क झाले. आजचे युग हे कॉम्प्युटरचे युग आहे. त्याच्या वापरामुळे आपले हाती लिखाण कमी झाले आहे. अशातच श्रेयाचे अक्षर पाहून जयंत पाटलांनी तिचे पत्र लिहून कौतुक केलं.

हेही वाचाः- आपल्यातील भांडण विसरा… अमृता फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

या पत्रात जयंत पाटलांनी  प्रिय श्रेया, तुझे खूप खूप अभिनंदन! तुझे हस्ताक्षर स्पर्धेतील लिखाण सोशल मीडियावर पाहिले आणि तुझे खुप कौतुक वाटले. तुझे वळणदार आणि सुंदर असे हे हस्ताक्षर जरूर जप. तुझ्या भावी शैक्षणिक कारकिर्दीला माझ्या शुभेच्छा!, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. हे पत्र जयंत पाटलांनी ट्विट आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट  केलं आहे. जयंत पाटील यांनी केलेल्या या पोस्टवर अनेक जण  श्रेयाचे अक्षर पाहून कौतुक करत आहेत. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा