Advertisement

आपल्यातील भांडण विसरा… अमृता फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांवर चिंता व्यक्त करताना आपल्यातील भांडण विसरून महिलांच्या सुरक्षेविषयी कठोर निर्णय घेण्याचं आवाहन अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केलं.

आपल्यातील भांडण विसरा… अमृता फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
SHARES

राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांवर चिंता व्यक्त करताना आपल्यातील भांडण विसरून महिलांच्या सुरक्षेविषयी कठोर निर्णय घेण्याचं आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना केलं आहे.

हेही वाचा- फडणवीस दिल्लीला गेले, तर फायदाच- एकनाथ खडसे

वर्ध्यामधील हिंगणघाट (hinganghat) इथं एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरूने तरुण प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. सद्यस्थितीत ही पीडित महिला जीवन-मृत्यूशी संघर्ष देत आहे. हा प्रकार ताजा असतानाच औरंगाबादमध्ये घरात घुसून एका महिलेला जिवंत जाळण्यात आलं. या घटनेत ९५ टक्के भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे महाराष्ट्र हादरला असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. 

त्याचा संदर्भ घेऊन अमृता फडणवीस (amruta fadnavis) यांनी चिंता व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे. ट्विटरवर व्यक्त होताना, त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रात गेल्या २ महिन्यात ४ acid attack च्य दुर्देवी घटना घडलेल्या अहेत! नागपूरमधे हिंगणघाट इथं पेट्रोल टाकून प्रोफेसर अंकिताला जाळण्याचा प्रयत्न, औरंगाबाद मधील बलात्काराचे प्रकरण-ऐकून त्रास होतो! आपल्यातील भांडणे विसरुन-सुरक्षिततेविषयी  कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा- आमची सुरक्षा वाढवा, ‘या’ दोन मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आपल्या दुसऱ्या मेसेजमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, देवेंद्र फडणवीस सरकारच्या ‘मनोधैर्य’ ह्या ‘acid attack victors’ सठी असलेल्या योजनेतील सवलती अंकिता ला देण्यात याव्या अणि महिला आयोग अध्यक्षाचे पद लवकर भारण्यात यावे- माननीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे खरे स्वप्नं आता जामिनीवर येऊन पूर्ण करा. असं आवाहन त्यांनी केलं आहे. 

या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टॅग केलं आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा