Advertisement

फडणवीस दिल्लीला गेले, तर फायदाच- एकनाथ खडसे

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना दिल्लीच्या राजकारणात बोलवण्यात येईल, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

फडणवीस दिल्लीला गेले, तर फायदाच- एकनाथ खडसे
SHARES

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना दिल्लीच्या राजकारणात बोलवण्यात येईल, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. तसं झाल्यास महाराष्ट्राचा फायदाच होईल, असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या वर्षाच्या अखेरपर्यंत २४५ सदस्यांच्या राज्यसभेत (Rajya sabha) ६९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. तर ४ जागा आधीच रिक्त आहेत. त्यामुळे यावर्षी राज्यसभेच्या ७३ जागांवर निवडणुका होणार आहेत. रिक्त होणाऱ्या जागांमध्ये १८ जागा भाजपच्या, तर १७ जागा काँग्रेसच्या आहेत. यापैकी महाराष्ट्रातून ७ सदस्यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या महाविकास आघाडीचे (maha vikas aghadi) ४, तर भाजपचे ३ जण आरामात विजयी होतील, असं म्हटलं जात आहे.

हेही वाचा- ठाण्यातील ‘क्लस्टर पुनर्विकास’ योजनेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी (pm narendra modi) आणि अमित शहा (amit shah) यांच्या जवळचे मानले जातात. अरूण जेटली, मनोहर पर्रिकर आणि सुषमा स्वराज या मोठ्या नेत्यांच्या निधनानंतर सध्या केंद्र सरकारमध्ये स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याची गरज असल्याचं म्हटलं जात आहे. राज्यात शिवसेनेसोबत मिळून सरकार स्थापन करणं शक्य नसल्याने देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना राज्यसभेवर निवडून आणून त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यावं किंवा संघटना पातळीवर महत्त्वपूर्व जबाबदारी द्यावी, असा भाजपचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे. 

त्याबाबत विचारलं असता भाजप नेते एकनाथ खडसे (eknath khadse) म्हणाले की, दिल्लीत येणं किंवा न येणं हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीवर अवलंबून नसून ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) दिल्लीला गेले, तर मला आनंदच होईल, या निर्णयाचं मी स्वागतच करेन. कारण ते दिल्लीत गेल्यास त्याचा महाराष्ट्राला फायदा होईल, असा टोला त्यांनी लगावला.

विधानसभेत उमेदवारी न मिळाल्यावरून तसंच रोहिणी खडसे (rohini khadse) यांचा पराभव झाल्यावरून एकनाथ खडसे यांनी जाहीर व्यासपीठावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. 

हेही वाचा- महिला अत्याचाराच्या घटनेचा तपास करताना हयगय नको, मुख्यमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना

दरम्यान महाराष्ट्रातून राज्यसभेवर (rajya sabha) पाठवण्यात येणाऱ्या नेत्यांमध्ये भाजपकडून रामदास आठवले यांना उमेदवारीचं आश्वासन देण्यात आलं आहे. सध्या राज्यसभेवर असलेले अमर साबळे पुन्हा उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. माजी खा. अजय संचेती यांच्यासह उदयनराजे भोसले यांचेही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत.    


संबंधित विषय
Advertisement