Advertisement

ठाण्यातील ‘क्लस्टर पुनर्विकास’ योजनेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या हस्ते गुरूवारी किसननगर आणि हाजुरी भागातील क्लस्टर पुनर्विकास योजनेचं भूमिपूजन करण्यात आलं.

ठाण्यातील ‘क्लस्टर पुनर्विकास’ योजनेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
SHARES

ठाणे शहरातील बहुचर्चित समूह पुनर्विकास योजनेच्या (thane cluster redevelopment project) पहिल्या टप्प्याच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या हस्ते गुरूवारी किसननगर आणि हाजुरी भागातील योजनेचं भूमिपूजन करण्यात आलं. याशिवाय दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (bal thackeray memorial) यांचे स्मारकाचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यांनी केलं.  

ठाण्यात साकारत असलेला क्लस्टर प्रकल्प (thane cluster redevelopment project) हा राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून गरजूंना आपल्या हक्काची घरं मिळण्यास मदत होणार आहे. एकत्रित पुनर्विकासाचा (cluster redevelopment project) हा प्रकल्प दिशा देणारा असा प्रकल्प ठरणार आहे, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं.  

हेही वाचा- बेकायदा गुटखा विकणाऱ्यांना मकोका लावणार, कडक कारवाईचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

ठाणे महापालिका (tmc) क्षेत्रातील झोपड्या, धोकादायक आणि बेकायदा इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी समूह पुनर्विकास योजना (thane cluster redevelopment project) राबविण्यात येत आहे. ही योजना राबविण्यासाठी राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर महापालिका प्रशासनाने ४४ नागरी समूह आराखडे तयार केले होते. या आराखड्यांना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने अंतिम मान्यता दिली आहे. तर ४४ पैकी ६ नागरी समूह आराखड्यांना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने (ud dapartment) मान्यता दिली आहे. त्यामध्ये किसननगर, कोपरी, राबोडी, हाजुरी, टेकडी बंगला आणि लोकमान्यनगर या परिसरातील आराखड्यांचा समावेश आहे. क्लस्टर योजनेच्या पहिल्या टप्प्यात किसननगर आणि हाजूरी भागातील प्रकल्पाला सुरूवात होणार आहे. त्याचं भूमीपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या हस्ते करण्यात आलं.  

या योजनेत सहभागी होणाऱ्या अधिकृत इमारतीतील रहिवाशांना अतिरिक्त २५ टक्के जागा देण्यात येणार असून त्यासाठी त्यांच्याकडून कोणतीच रक्कम घेतली जाणार नाही. या योजनेतील प्रकल्पाची नोंदणी रेराअंतर्गत केली जाणार आहे.

हेही वाचा- शिवसेनेची जागा मनसेला, काँग्रेसचा डाव ओळखा- चंद्रकांत पाटील

सोबतच प्रभाग क्रमांक १९ मध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.

या भूमिपूजन कार्यक्रमाला ठाणे महापौर नरेश म्हस्के, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महापालिका आयुक्त संजीव जायस्वाल, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती अध्यक्ष राम रेपाळे, उपमहापौर पल्लवी कदम, विरोधी पक्षनेते प्रमिला केणी, इ. तसंच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा