Advertisement

शिवसेनेची जागा मनसेला, काँग्रेसचा डाव ओळखा- चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रात वर्षअखेरीस मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp leader chandrakant patil) यांनी केला.

शिवसेनेची जागा मनसेला, काँग्रेसचा डाव ओळखा- चंद्रकांत पाटील
SHARES

काँग्रेस (congress) अगदी योजनाबद्धपणे शिवसेनेला (shiv sena) हिंदुत्वापासून (hindutva) दूर नेत आहे. शिवसेनेची जागा मनसेने (mns) घ्यावी, असा यामागचा डाव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी वेळीच हा डाव ओळखावा. नाहीतर महाराष्ट्रात वर्षअखेरीस मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp leader chandrakant patil) यांनी केला.

हेही वाचा- विनायक मेटेंचा शिवस्मारक समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पाटील यांनी हे वक्तव्य केलं. मी शिवसेनाचा (shiv sena) हितचिंतक आहे, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला न मागता अनेक सल्लेही दिले. काँग्रेस अतिशय नियोजनबद्धरितीने शिवसेनेला हिंदुत्त्वापासून दूर नेत आहे. शिवसेना होती म्हणून मराठी माणूस (marathi manoos), हिंदू माणूस वाचला. पण आता शिवसेनेची जागा मनसेला उपलब्ध करून दिली जात आहे. सद्यस्थितीत सर्वसामान्य माणसाच्या मनात हिंदुत्त्ववादी म्हणून भाजपा आणि मनसे येऊ लागली आहे. याचा विचार उद्धव ठाकरे यांनी जरूर करावा, असं चंद्रकांत पाटील (bjp leader chandrakant patil) म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) वारंवार सांगतात की मी हिंदुत्व (hindutva) सोडलेलं नाही. मग स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेसकडून गलिच्छ आरोप झाले, तेव्हा शिवसेना गप्प का बसली होती? असा प्रश्न विचरताना उद्धव ठाकरे यांनी ७ मार्चला अयोध्येला जावं तसंच वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करावी, असा सल्ला दिला.

हेही वाचा- घुसखोरांना हाकलण्याचं उगाच श्रेय घेऊ नका, उद्धव ठाकरेंचा मनसेला टोला

केंद्र सरकारने केलेला सुधारीत नागरिकत्व कायदा (caa) कुणालाही देशातून बाहेर काढण्यासाठी केलेला नाही. उलट हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं नसेल, तर शिवसेनेने एनआरसी (nrc) कायद्याला समर्थन द्यावं. हा कायदा महाराष्ट्रात लागू करावा तसंच महाराष्ट्रात या कायद्याविरोधात सुरू असलेली आंदोलने देखील थांबवावी, असं आवाहन पाटील यांनी केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा