Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

विनायक मेटेंचा शिवस्मारक समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Shiv sangram leader vinayak mete) यांनी बुधवारी शिवस्मारक समिती अध्यक्षपदाचा राजीनामा (resignation) दिला.

विनायक मेटेंचा शिवस्मारक समिती अध्यक्षपदाचा राजीनामा
SHARES

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Shiv sangram leader vinayak mete) यांनी बुधवारी शिवस्मारक समिती अध्यक्षपदाचा राजीनामा (resignation) दिला. विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना पत्र पाठवत आपला राजीनामा सुपूर्द केला. या पत्रात त्यांनी शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे.

भाजप सरकारने २०१५ साली विनायक मेटे यांच्याकडे स्मारक समितीच्या (shiv smarak committee) अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. तेव्हापासून ते या पदावर होते. शिवस्मारकाचं काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी राज्य सरकारकडून अपेक्षित मदत न मिळाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा- हे माझं हिंदुत्व नाही, मुख्यमंत्र्यांत्र्यांचा भाजपला टोला

मुंबईतील गिरगाव चौपाटीजवळची जागा शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी (shivaji maharaj memorial) निश्चित करण्यात आली आहे. एकूण १६.८६ हेक्टर आकाराच्या खडकावर हे स्मारक उभारण्यात येणार आहे. ही जागा गिरगाव चौपाटीपासून ३.६ किमी, नरिमन पॉईंटपासून २.६ किमी, तर राजभवनपासून १.२ किमी अंतरावर आहे. या स्मारकाचं भूमिपूजन होऊनही अद्याप या स्मारकाच्या कामाला सुरूवात होऊ शकलेली नाही. तर भाजप सरकारच्या काळात निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोपही काँग्रेस, राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता. 

नवीन सरकार सत्तेत येऊनही अद्याप या स्मारकाच्या कामासाठी एकही बैठक घेण्यात आलेली नाही. सरकारी अधिकाऱ्यांकडून चालढकल करण्यात येते, अशा अनेक कारणांमुळे मेटेंनी (vinayak mete) हा राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. 

विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की, 'छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अमंलबजावणी, देखरेख व समन्वय समितीच्या अध्यक्षपदी २०१५ पासून कार्यरत आहे. उद्धवजी आपल्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यामुळे आपल्या विचारानुसार इतर विकासाची कामे होणं अपेक्षित आहे. तसंच, शिवस्मारकाचं काम सुद्धा आपल्या विचाराने व्हावं म्हणून मी समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.'

हेही वाचा- येतो का पक्षात? जेव्हा राज ठाकरे स्वत:च देतात आॅफर

'आपल्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावं. तसंच, शिवस्मारकाच्या कामासाठी भविष्यात काही आवश्यकता लागल्यास माझे सहकार्य सदैव राहिल, असे देखील विनायक मेटेंनी पत्रात नमूद केलं आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा