Advertisement

हे माझं हिंदुत्व नाही, मुख्यमंत्र्यांत्र्यांचा भाजपला टोला

हिंदुत्वाच्या नावाखाली शिवसेनेवर (shiv sena) टीका करणाऱ्या भाजपवर मुख्यमंत्री आणि ​शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे​​​ (cm uddhav thackeray) यांनी जोरदार प्रहार केले.

हे माझं हिंदुत्व नाही, मुख्यमंत्र्यांत्र्यांचा भाजपला टोला
SHARES

धर्माची होळी पेटवून सत्ता मिळवणं हे माझं हिंदुत्व (Hindutva) नाही. असं हिंदुत्व मी मानत नाही. माझ्या हिंदूराष्ट्रची व्याख्या वेगळी आहे, असं म्हणत हिंदुत्वाच्या नावाखाली शिवसेनेवर (shiv sena) टीका करणाऱ्या भाजपवर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी जोरदार प्रहार केले.

सामनाचे संपादक संजय राऊत (sanjay raut) यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विषयावर रोखठोकपणे मतं मांडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सत्ता स्थापन केल्याने शिवसेनेवर भाजपकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. शिवसेनेने हिंदुत्वाला (hindutva) बगल दिल्याचा आरोपही भाजपकडून (bjp) होत आहे. या आरोपांना उत्तर देताना उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या व्याख्येच्या समाचार घेतला.

हेही वाचा- शिवसैनिकांनी भाजप कार्यालयाबाहेर लावले आशिष शेलारांचे अर्धनग्न फोटो

सीएए (caa) आणि एनआरसी (nrc)सारखे विषय आणून जिथे भाजपची सत्ता नाही, अशा महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यांमध्ये अस्थिरता निर्माण करायची, दंगे-धोपे घडवायचे आणि राज्य उलथवून टाकायची याला कट मानायचं का? असा प्रश्न राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.

त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी प्रतिप्रश्न केला की, याला हिंदुत्व (hindutva) म्हणायचं का? जर हे हिंदुत्व नसेल, तर मी कोणापासून फारकत घेतली? हे माझे समविचारी आहेत? धर्माची होळी पेटवून सत्ता मिळवणं, हे माझं हिंदुत्व नाही. मी नक्कीच म्हणेन की, मला हिंदुराष्ट्र पाहिजे, पण जळणारं, अशांत हिंदुराष्ट्र मला अपेक्षित नाही. असं हिंदुराष्ट्र मी मानत नाही. माझ्या हिंदुराष्ट्रची व्याख्या वेगळी आहे. माझ्या वडिलांनी शिकवलेलं हे हिंदुत्व नाही. माणसं माणसाला मारतील, हिंदुत्वाच्या नावाखाली गैरसमज निर्माण करून सत्ता मिळवणं हे माझं हिंदुत्व नाही, या शब्दांत उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी भाजपला फटकारलं. 

हेही वाचा- राज्याच्या तिजोरीत खडखडाट, निधी अभावी ‘१ रुपयात आरोग्य तपासणी’ योजना गुंडाळणार

माझं हिंदुत्व (hindutva) आजही कायम आहे. पक्ष आणि व्यक्ती म्हणून माझीही काही मतं आहेत. सरकार चालवताना ते आम्ही घटनेच्याच चौकटीत राहून चालवतो. नरेंद्र मोदी घटनेला धरून सरकार चालवताहेत की हिंदुत्वाला धरून? असा प्रश्नही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा