Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,44,710
Recovered:
56,85,636
Deaths:
1,16,026
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,807
666
Maharashtra
1,39,960
9,830

बेकायदा गुटखा विकणाऱ्यांना मकोका लावणार, कडक कारवाईचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

शरीराला हानीकारक असलेल्या गुटख्याचं उत्पादन (gutka production) आणि त्याची राज्यात बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरूद्ध मकोका (macoca) अंतर्गत कारवाई करण्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

बेकायदा गुटखा विकणाऱ्यांना मकोका लावणार, कडक कारवाईचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश
SHARES

शरीराला हानीकारक असलेल्या गुटख्याचं उत्पादन (gutka production) आणि त्याची राज्यात बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरूद्ध मकोका (macoca) अंतर्गत कारवाई करण्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी दिली. 

हेही वाचा- महिला अत्याचाराच्या घटनेचा तपास करताना हयगय नको, मुख्यमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना

उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अन्न व औषध प्रशासन (fda) मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत त्यांनी राज्यात यापुढील काळात गुटखाबंदी (gutka ban) कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. गुटखाविक्रीला संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देखील पवार यांनी दिला.

गुटख्याची विक्री करणाऱ्या कंपन्यांचे मालक तसंच राज्यात बेकायदेशीरपणे गुटख्याची विक्री करणारे सूत्रधार यांच्याविरुद्ध मकोका (macoca) अंतर्गत कारवाई करण्याचा राज्य शासन गांभीर्याने विचार करत असल्याचं अजित पवार यांनी या बैठकीत सांगितलं. शिवाय ज्या परिसरात गुटखा आणि प्रतिबंधित खाद्यपदार्थांचा साठा आढळून येईल किंवा अशा पदार्थांची अवैध वाहतूक होत असल्याचं आढळून येईल, त्या ठिकाणच्या अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या (fda) अधिकाऱ्यांविरुद्ध तसंच पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

हेही वाचा- Video: माटुंगा स्थानकात विकृताने घेतलं विद्यार्थीनीचं चुंबन

सध्या राज्यात विक्री होत असलेल्या गुटखा (gutka) आणि प्रतिबंधित सुपारी (supari), मावा, खर्रा यांच्या ब्रँडची नावेही अजित पवार यांनी बैठकीत वाचून दाखवली तसंच या कंपन्यांवर आणि या पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर  कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा