Video: माटुंगा स्थानकात विकृताने घेतलं विद्यार्थीनीचं चुंबन

माटुंगा परिसरातील रेल्वे पादचारी पुलावर महिला, तरुणींना एकटेपाहून विकृताकडूनअश्लील चाळे करायचा.

Video: माटुंगा स्थानकात विकृताने घेतलं विद्यार्थीनीचं चुंबन
SHARES

हिंगणगाठ आणि औरंगाबादमध्ये तरुणींवर झालेल्या अत्याचारानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एेरणीवर आला असताना. मुंबईच्या माटुंगा परिसरात ही अशीच एक घटना समोर आली आहे. माटुंगा परिसरातील रेल्वे पादचारी पुलावर महिला, तरुणींना एकटेपाहून विकृताकडूनअश्लील चाळे केले जात असल्याची घटना पुढे आली आहे. नुकतीच एका विकृताने एका विद्यार्थीनीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीत तरुणीने त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका केली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 


हेही वाचाः- मुंबईच्या वाहतूकीचे Live अपडेट

माटुंगाच्या रेल्वे पादचारीपूलावर अंधारात थांबून हा विकृत एकाट्या मुलींना लक्ष करायचा. एकट्या मुलीकडे पाहून हस्तमैथून करणे, मुलींची छेड काढणे हे त्याचे प्रकार सुरूच होते. मात्र कुणी ही पोलिसात तक्रार नोंदवण्यासाठी पुढे येत नव्हते. दरम्यान काही दिवसांपूर्वी या विकृताने एकट्या जाणाऱ्या तरुणीची वाट अडवत तिचे जबरदस्ती चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला.  या प्रकरणी दोन तरुणींनी पुढे येऊन पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सीसीटिव्ही फूटेजच्या मदतीने आरोपी  रजी हबीबूर खानला सापळारचून अटक केली. या विकृताने आतापर्यंत अनेक तरुणींसोबत अशा प्रकारे अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्या विरोधात पोलिसांनी ३५४ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

अशा घटनांना आळा घालण्यासाठी कार्यालयीन कामाच्या वाढत्या व्यापामुळे रात्री उशिरा घरी परतणाऱ्या मुंबईतील महिलांना लवकरच रेल्वेच्या जवानांचा आधार मिळणार आहे. रात्री प्रवास करणाऱ्या महिलांना घरापर्यंत अथवा इतर सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी 'कॉल करा, आरपीएफ बोलवा' हे मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बला सुरू केली. या योजनेंतर्गत रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १८२वर दूरध्वनी करून महिलांना रात्री १२ ते पहाटे सकाळी ६ दरम्यान सुरक्षित प्रवासासाठी जवानांची मागणी करण्यात येईल.



हेही वाचा - 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा