Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

एसटीच्या अॅपमध्ये मराठीला स्थान नाही

एसटीच्या अॅपमध्ये मराठी (Marathi) वगळून हिंदी (Hindi) आणि इंग्रजी (English) भाषेचा वापर करण्यात आला आहे.

एसटीच्या अॅपमध्ये मराठीला स्थान नाही
SHARES

महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक ठिकाणी स्वस्त दरात व सुखरूप प्रवासासाठी प्रवासी एसटीला प्राधान्य देतात. या प्रवाशांना एसटी (ST) बाबात अधिक माहिती (Information) मिळावी यासाठी मोबाईल अॅपची (Mobile App) सुविधा सुरू करण्यात आली आहे. परंतु, विषेश म्हणजे, एसटी महामंडळाच्या (MSRTC) या अॅपमध्ये मराठी भाषेलाच (Marathi Language) स्थान देण्यात आलेलं नाही. या अॅपमध्ये मराठी (Marathi) वगळून हिंदी (Hindi) आणि इंग्रजी (English) भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

राज्यभरात एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मराठी भाषिक प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळं अॅपमध्ये मराठी भाषा (Marathi Language) असावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. एसटीत टप्प्याटप्प्यानं वाहन शोध व प्रवासी माहिती प्रणाली (VTS) कार्यान्वित होत आहे. या तंत्रज्ञानामुळं गाडी कुठे पोहचली, गाडी किती वेळात अपेक्षित आहे, याची माहिती प्रवाशांना प्रत्यक्ष वेळेत पाहता येण्यासाठी एसटीनं 'एमएसआरटीसी कम्प्युटर अॅप' (MSRTC Computer App) नावाचं मोबाइल अॅप विकसित करण्यात आलं आहे.

एसटी महामंडळाचं हे मोबाइल अॅप सुरू करताच 'महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामण्डल' असं हिंदी भाषेतील प्रथम दर्शनी नाव येत. त्याशिवाय, या मोबाइल अॅपमध्ये जवळचं एसटी स्थानक शोधण्यासाठी 'बस स्टँड नीअर मी', एसटीचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी 'ट्रॅक युवर बस', स्थानक शोधणं 'सर्च स्टॉपेज', मार्ग शोधणं 'रूट सर्च', आपत्कालीन मदतीसाठी 'इमर्जन्सी' असं पर्याय आहेत.

एकीकडं भाषेची समस्या आहेच दुसरीकडे अद्यापही महामंडळाच्या संपूर्ण गाड्यांची माहिती अॅपवर दिसत नाही. यामुळे अद्याप या अॅपमध्ये बरीच सुधारणा हवी आहे.हेही वाचा -

एमआरआयडीसी २ वर्षांत करणार 'या' १० पुलांची पुनर्बाधणी

महापालिका शाळांचं होणार नामांतर, 'या' नावानं ओळखल्या जाणारसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा