Advertisement

एमआरआयडीसी २ वर्षांत करणार 'या' १० पुलांची पुनर्बाधणी

मुंबईतील ब्रिटिशकालीन १० उड्डाणपूल न पाडताच त्याठिकाणी नवीन पुलांच्या उभारणीसंदर्भातील तंत्रज्ञानाची चाचपणी ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट कॉपरेरेशन लिमिटेड’कडून (MRIDC) केली जात आहे.

एमआरआयडीसी २ वर्षांत करणार 'या' १० पुलांची पुनर्बाधणी
SHARES

पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरील अंधेरी स्थानकातील (Andheri Station) गोखले पूल (Gokhle Bridge) कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर जाग आलेल्या प्रशासनानं मुंबईतील धोकादायक पुलांचं स्ट्रक्चरल ऑडीट (Structural audit) करून त्यांची दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, अनेक पादचारी पूल प्रवाशांसाठी व काही पूल वाहतूकीसाठी बंद केले आहेत. अनेक पुलांच्या दुरूस्तच्या (Bridge Repair) कामाला देखील सुरूवात केली आहे. मात्र, एकाच वेळेला अनेक पूल बंद केल्यानं वाहन चालकांना वळसा घालून प्रवास करावा लागतो आहे, तर पादचाऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. 

मुंबईतील धोकादायक ठरत असलेले जुने उड्डाणपूल पाडून नवी पुलांची उभारणी करताना वाहतूक व्यवस्थेवर पडणारा ताण पाहून प्रशासकीय यंत्रणानं आता त्यावर नवीन उपाय शोधला आहे. मुंबईतील ब्रिटिशकालीन १० उड्डाणपूल न पाडताच त्याठिकाणी नवीन पुलांच्या उभारणीसंदर्भातील तंत्रज्ञानाची चाचपणी ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट कॉपरेरेशन लिमिटेड’कडून (MRIDC) केली जात आहे.

मुंबई पालिकेसोबत या पुलांच्या बांधकामासाठी सामंजस्य करार केला जाणार असून, काम सुरू होताच ६५० दिवसांत नवीन उड्डाणपूल बांधणीचं उद्दिष्ट ठेवल्याची माहिती समोर येत आहे. या उड्डाणपुलांमध्ये भायखळा उड्डाणपूल, भायखळा-सॅण्डहर्स्ट रोड दरम्यानचा ओलिवंट उड्डाणपूल, महालक्ष्मी, दादर स्थानकावरील टिळक उड्डाणपुलांसह अन्य पुलांचा समावेश आहे.

पुलांची दुरूस्ती करण्यात येणार असली तरी, एकाचवेळी या पुलांची कामं घेतल्यास मुंबईकरांना काही प्रमाणात तरी वाहतुकीच्या समस्येला सामोरं जावं लागण्याची शक्यता मात्र आहे.

रेल्वे हद्दीत येणाऱ्या उड्डाणपुलांची आयआयटी, पालिका व रेल्वेकडून तपासणीही करण्यात आली. त्यानंतर धोकादायक असलेल्या ब्रिटिशकालीन लोअर परळ स्थानकावरील उड्डाणपूल पाडण्यात आला. मुंबई पालिकेच्या या उड्डाणपुलाचं काम पूर्ण होण्यासाठी १ वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागणार असून, त्यामुळे स्थानिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्याशिवाय, चर्नी रोड व ग्रॅण्ट रोड दरम्यान असलेल्या धोकादायक फेररे उड्डाणपूलही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मध्य रेल्वे मार्गावरील सॅण्डहर्स्ट रोड येथील रेल्वे हद्दीतील हँकॉक पूलही पाडण्यात आला आहे.

हे पूल बंद असल्यानं रहिवाशांचा मनस्ताप वाढलला आहे. त्यात आता मुंबई पालिकेच्या ब्रिटिशकालीन आणखी १० उड्डाणपुलांचीही पुनर्बाधणीची कामं केली जाणार आहे. या पुलांचं काम एमआरआयडीसीकडून (MRIDC) केलं जाणार असून त्याचे सव्‍‌र्हेक्षणाचं काम आणि आरेखनही पूर्ण करण्यात आलं आहे.

'या' १० पुलांची दुरूस्ती

  • भायखळा उड्डाणपूल (भायखळा ते सॅण्डहर्स्ट रोड)
  • ओलिवंट उड्डाणपूल (भायखळा ते सॅण्डहर्स्ट रोड)
  • महालक्ष्मी उड्डाणपूल (महालक्ष्मी स्थानक)
  • आर्थर रोड उड्डाणपूल (चिंचपोकळी स्थानकाजवळील)
  • घाटकोपर उड्डाणपूल (घाटकोपर स्थानक)
  • बेलासिस उड्डाणपूल (मुंबई सेन्ट्रल स्थानक)
  • गार्डन (एस उड्डाणपूल) (भायखळा स्थानकाजवळील)
  • टिळक उड्डाणपूल ( दादर स्थानक)
  • रे रोड उड्डाणपूल (रे रोडस्थानक)
  • करी रोड उड्डाणपूल (करी रोड स्थानकाजवळील)



हेही वाचा -

मलबार हिल इथल्या इमारतीला आग

लैंगिक छळप्रकरणी कोरिओग्राफर गणेश आचार्यविरोधात गुन्हा दाखल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा