लैंगिक छळप्रकरणी कोरिओग्राफर गणेश आचार्यविरोधात गुन्हा दाखल

गणेश आचार्यनं बळजबरीनं पॉर्न (Porn) दाखवली असा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे. गणेश आचार्यनं त्याच्यावरील आरोपांचं खंडन केलं आहे.

लैंगिक छळप्रकरणी कोरिओग्राफर गणेश आचार्यविरोधात गुन्हा दाखल
SHARES

लैंगिक छळ केल्याप्रकरणी कोरिओग्राफर गणेश आचार्य (Ganesh Acharya) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबोली पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यासोबत आणखी दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या महिलांविरोधात गुन्हा दाखल

गणेश आचार्यसोबतच जयश्री केळकर आणि प्रीती लाड या दोन महिलांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन महिलांनी २६ जानेवारी रोजी फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोसिएशनच्या कार्यक्रमात पीडितेला मारहाण केली असल्याचा आरोप केला आहे.


पॉर्न दाखवल्याचा आरोप

गणेश आचार्यनं बळजबरीनं पॉर्न (Porn) दाखवली असा आरोप करण्यात आला आहे. इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोसिएशनचा गणेश आचार्य जनरल सेक्रेटरी झाला तेव्हापासून मला त्रास देत आहे. जेव्हा मी गणेशचं ऐकलं नाही, तेव्हा गणेशनं त्याच्या पदाचा वापर करून असोसिएशनमधून काढून टाकलं असा आरोप महिलेनं केला होता


पोलिसांचा तपास सुरू

याप्रकरणी काही दिवसांपूर्वीच पीडित महिलेनं राज्य महिला आयोगाकडे गणेश आचार्यविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगानं याबाबतची माहिती पोलिसांकडे मागितली होती. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. गणेश आचार्य आणि अन्य दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे

गणेश आचार्यकडून आरोपांचं खंडन

दरम्यान याप्रकरणी गणेश आचार्यनं पत्रकार परिषद घेत आपल्यावरील सर्व आरोपांचं खंडन केलं होतं. याप्रकरणी त्यानं कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली आहे. पत्रकार परिषदेत त्याच्यासोबत त्याची पत्नी देखील उपस्थित होती. ती म्हणाली की, मी गेले १९ वर्ष त्याच्यासोबत आहे. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे

यावर गणेश आचार्य म्हणाला की, 'जेव्हा चिखल उडतो, तेव्हा तो धुवायचाही असतो. मी माझ्या अंगावर चिखल कशाला सुकवू? मला किंवा माझ्या कुटुंबीयांना या आरोपांमुळे प्रॉब्लेम झालेला नाही. लोकांनाही ठाऊक आहे की काय आहे? आणि काय नाही?



हेही वाचा

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास महिलेचा नकार, माथेफिरूनं ज्वालाग्रही रसायन ओतलं

ग्राहकानं चोरली डिलेव्हरी बॉयची दुचाकी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा