Advertisement

मलबार हिल येथील इमारतीला भीषण आग, ८ जणांची सुखरूप सुटका

मलबार हिल इथल्या इमारतीला लागलेली आग विजवण्याचे अग्नीशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मलबार हिल येथील इमारतीला भीषण आग, ८ जणांची सुखरूप सुटका
SHARES

मुंबईच्या मलबार हिल (Malabar Hill) परिसरातल्या हँगींग गार्डन शेजारील इमारतीला आग (Fire) लागली आहे. लॅसपालमास असं या इमारतीचं नाव आहे. इमारत १४ मजल्याची असून पाचव्या मजल्यावर सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे भीषण आग लागली आहे. रात्री ८ च्या सुमारास ही आग लागली. मलबार हिल हा मुंबईतील उच्चभ्रू असा परिसर मानला जातो.

 

आगीची माहिती मिळताच घटनास्तळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि ७ पाण्याचे टँकर्स  पोहोचल्या. तसंच, अग्नीशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत अखेर ११.४० वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आणली. या आगीत अग्नीशमन दलाकडून ८ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढलं. तसंच, या आगीत इमारतीमधील रहिवाशी अजय जाधव (४०) व अग्नीशमन दलाचे फायरमन राहुल कावटे (२८) हे दोन जण जखमी झाले आहेत.

 

या दोघांना उपचारासाठी तातडीनं गोकुळदास तेजपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचं माहिती मिळते. या आगीमुळं मलाबार हिल परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. हँगिंग गार्डन परिसरात मोठी वाहतुककोंडी झाल्याचीही माहिती समोर येत आहे.



हेही वाचा

मुंबईत ६ महिन्यांत ‘इतक्या’ ठिकाणी लागली आग


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा