आर्थिक राजधानी मुंबईत दरदिवशी कुठं ना कुठं लहान-मोठी आग (fire) लागतच असते. असं असूनही मागील ६ महिन्यांत मुंबईत लागलेल्या आगीचा आकडा तुम्हाला सांगितला, तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. होय. हे खरं आहे, कारण मुंबईत मागच्या ६ महिन्यांमध्ये तब्बल २ हजार ५६८ आगीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये ११३ जण होरपळले असून १६ जणांनी या आगीत आपले प्राण गमावले आहेत.
आगीच्या घटनांमध्ये कोट्यवधी रुपयांचं नुकसान देखील झालं आहे. यापैकी मुंबई शहरात १ हजार ७४५ आगीच्या घटना घडल्या असून मुंबई उपनगरात(mumbai city and suburban) ८२३ आगीच्या घटना घडल्या आहेत.
हेही वाचा- तबेले मुंबईबाहेर हलवा, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत आगीच्या सर्वाधिक घटना या जून आणि जुलै महिन्यातच घडलेल्या आहेत. अग्निशमन विभागाने (fire department) १ एप्रिल २०१९ ते १५ आॅक्टोबर २०१९ दरम्यान मुंबई आणि उपनगरात लागलेल्या आगींची सविस्तर माहिती मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीला दिली. मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे (chief fire officer prabhat rahangdale) यांनी सांगितलं की, बहुतेक ठिकाणी शाॅर्ट सर्किटमुळेच (short circuit) आगी लागल्या आहेत. मुंबईकर आगीच्या बाबतीत दक्ष झाल्यास अशा घटनांना नक्कीच टाळता येऊ शकतं. त्यामुळे अग्निशमन दलाकडूनही मुंबईकरांमध्ये आगीच्या घटना टाळण्यासाठी जनजागृतीचं काम केलं जात आहे.
अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, ( bmc fire department) मुंबई शहरात जून महिन्यात सर्वाधिक ३९४ आगीच्या घटना घडल्या होत्या. त्यातही १ जून ते १५ जून दरम्यान १९७ आणि १६ जून ते ३० जून दरम्यान १९७ वेळा ठिकठिकाणी आग लागली होती. तर उपनगरात याच कालावधीत १ जून ते ३० जून दरम्यान २३७ ठिकाणी आग लागली होती आणि जुलै महिन्यात उपनगरात १२० ठिकाणी आग लागली आहे.
हेही वाचा- देवनार डम्पिंग ग्राऊंडला उच्च न्यायालयाकडून पुन्हा मुदतवाढ
या आगींच्या घटनांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरात (mumbai city and suburban) मिळून मागील ६ महिन्यांमध्ये ११३ जण गंभीर स्वरुपात होरपळले होते. यापैकी ७३ जण शहरातील, तर ४० जण उपनगरातील होते. जून महिन्यात १७ जण आगीत सापडून होरपळले होते. तर मे, जूनमध्ये हाच आकडा प्रत्येकी ८ एवढा होता. उपनगरातही जुलैमध्ये १७ जण आगीत होरपळले होते. तर जूनमध्ये ११ जण होरपळले होते.
आगीच्या घटनांमध्ये होरपळून १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.