Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,72,781
Recovered:
57,19,457
Deaths:
1,17,961
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,809
733
Maharashtra
1,32,241
9,361

आमची सुरक्षा वाढवा, ‘या’ दोन मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्र विकास आघाडीतील (Maha vikas aghadi) दोन मंत्र्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हणत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्याकडे केली आहे.

आमची सुरक्षा वाढवा, ‘या’ दोन मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
SHARES

महाराष्ट्र विकास आघाडीतील (Maha vikas aghadi) दोन मंत्र्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हणत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्याकडे केली आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली.

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत (cabinet meeting) मुख्यमंत्र्यांकडून विविध विषयांचा आढावा घेण्यात येत असताना महिलांच्या सुरक्षेच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्याकडे सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची विनंती केली. 

हेही वाचा- महिला अत्याचाराच्या घटनेचा तपास करताना हयगय नको, मुख्यमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना

डॉ. नरेंद्र दाभोलकर (narendra dabholkar), कॉम्रेड गोविंद पानसरे (govind pansare) यांची हत्या झाल्यानंतर आपल्या घराचीही रेकी करण्यात आली होती. मात्र भाजप सरकारने आवश्यक सुरक्षा पुरवण्याऐवजी कमी केली होती. त्यामुळे काही कट्टर संघटनांचे हेतू लक्षात घेता आपल्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा वाढवावी, असं आवाहन जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी केलं. 

 प्रश्न उपस्थित केले आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्याकडे सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (5 फेब्रुवारी) झालेल्या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. सरकार माजी मंत्र्यांना सुरक्षा पुरवतं, मग आजी मंत्र्यांना आवश्यक सुरक्षा हवी, असं दोन्ही नेत्याचं म्हणणं आहे. 

जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनीही सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा धोका पाहता, आपल्याही जीवाला धोका असल्याने सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. 

हेही वाचा- शिवसेनेची जागा मनसेला, काँग्रेसचा डाव ओळखा- चंद्रकांत पाटील

आव्हाड आणि वडेट्टीवार यांच्या मागणीनंतर पोलिसांच्या अहवालात काही आढळल्यास यासंदर्भात निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री दोघांना म्हणाले

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा