Advertisement

म्हाडा मंडळावरील नियुक्त्या रद्द, भाजप नेत्यांना फटका

भाजप सरकारच्या काळात म्हाडाच्या (mhada) विविध मंडळावर करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांनी घेतला आहे.

म्हाडा मंडळावरील नियुक्त्या रद्द, भाजप नेत्यांना फटका
SHARES

भाजप सरकारच्या काळात म्हाडाच्या (mhada) विविध मंडळावर करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांनी घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजप नेत्यांना (bjp) देण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर शिवसेना (shiv sena) नेत्यांच्या नियुक्त्या कायम ठेवण्यात आल्या आहेत.  

हेही वाचा- ठाण्यातील ‘क्लस्टर पुनर्विकास’ योजनेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

निवडणुकीत पक्षासाठी महत्त्वाचं योगदान देणाऱ्या परंतु मंत्रिमंडळात स्थान मिळू न शकणाऱ्या नेत्यांची वर्णी राज्य सरकारच्या विविध महामंडळांवर लावण्याची राजकीय पक्षांची जुनी प्रथा आहे. याच प्रथेनुसार मागील युती सरकारच्या काळात भाजप आणि शिवसेना नेत्यांची वेगवेगळ्या महामंडळांवर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी (maha vikas aghadi) सरकार सत्तेत आल्याने या सरकारने जुन्या नियुक्त्या रद्द करायला सुरूवात केली आहे.  

त्यानुसार म्हाडाच्या विविध मंडळांवर करण्यात आलेल्या राजकीय व्यक्तींच्या नियुक्‍त्या रद्द करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. उदय सामंत (uday samant) यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्रिपद देण्यात आल्याने त्यांचे म्हाडा अध्यक्षपद रद्द करण्यात आलं आहे. मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण (madhu chavan), नागपूर मंडळाचे तारिक कुरेशी, कोकण मंडळाचे बाळासाहेब पाटील, औरंगाबाद मंडळाचे संजय केणेकर, नाशिक मंडळाचे बबन चौधरी आणि पुणे मंडळाचे उपसभापती विक्रम पाटील या भाजप नेत्यांच्या नियुक्‍त्या रद्द करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. 

हेही वाचा- आपल्यातील भांडण विसरा… अमृता फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

परंतु म्हाडाच्या मुंबई दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर (vinod ghosalkar), मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे विजय नहाटा आदी शिवसेना नेत्यांची पदे कायम ठेवण्यात आली आहेत. 

रिक्त झालेल्या पदांवर लवकरच महाआघाडीत सामील पक्षांतील नेत्यांची नियुक्ती होऊ शकते. 

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा