Advertisement

ग्रँट रोड व गोरेगावकरांना 'बेस्ट'चा दिलासा

मुंबईतील अनेक मार्गावर ही बस धावत आहे. या बसच्या माध्यमातून प्रवाशांना कमी तिकीट दरात गारेगार प्रवास करता येतो.

ग्रँट रोड व गोरेगावकरांना 'बेस्ट'चा दिलासा
SHARES

मुंबईतील वाढत्या वाहनांच्या संख्येमुळं सामान्यांना मोठ्या त्रासाला सामेरं जावं लागतं. गल्लोगल्ली वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागत असल्यानं प्रवाशांना अधिक वेळ खर्च करावा लागतो. मात्र, प्रवाशांची या त्रासातून सुटका करण्यासाठी बेस्टनं (BEST) काही महिन्यांपूर्वी मिनी एसी बसची (Mini AC Bus) सेवा सुरू केली. मुंबईतील अनेक मार्गावर ही बस धावत आहे. या बसच्या माध्यमातून प्रवाशांना कमी तिकीट दरात गारेगार प्रवास करता येतो. त्यामुळं प्रवाशांची या मिनी एसी बसला मागणी वाढली आहे. 

प्रवाशांचा वाढलेला प्रतिसाद पाहता बेस्टनं अनेक छोट्या रस्त्याच्या व वर्दळीच्या मार्गावर ही सेवा सुरू केली आहे. त्याचप्रमाणं, आता गोरेगाव (Goregaon) व ग्रॅण्ट रोड (Grant Road) परिसरात बेस्टनं ही सेवा सुरू केली आहे. त्यामुळं येथील रहिवाशांना (Residence) मोठा दिलासा मिळाला आहे.

बस मार्ग

  • बस मार्ग ए-४५१ ही गोरेगाव रेल्वे स्थानक (पू) ते आदर्श नगर (आरे वसाहत) या मार्गावर चालविण्यात येणार आहे. पहिली बस ६.०० वाजता चालविण्यात येणार असून, शेवटची बस १०.०० वाजता चालविण्यात येणार आहे.
  • बस मार्ग ए-१०४ ही ग्रँट रोड स्थानक (प) ते जे.मेहता मार्ग या मार्गावर चालविण्यात येणार आहे. पहिली बस सकाळी ६.०० वाजता व शेवटची बस १०.०० वाजता चालविण्यात येणार आहे.



हेही वाचा -

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा