पीएनबी बँक घोटाळ्याप्रकरणी मुख्य लेखापालला अटक

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • क्राइम

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकानं बुधवारी बँकेचा मुख्य लेखापरीक्षक (ऑडिटर जनरल) एम. के. शर्मा यांना अटक केली. शर्मा मुख्य व्यवस्थापक दर्जाचे अधिकारी असून, गैरव्यवहार झालेल्या ब्रॅडी हाऊस शाखेच्या लेखापरीक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे लेखापरीक्षण करताना त्यांना संशय कसा आला नाही, हे संशयास्पद असल्यामुळे सीबीआयने त्यांना अटक केली.

दोन गुन्हे दाखल

लेटर ऑफ अंडरटेकिंग देऊन पीएनबी बँकेमध्ये झालेल्या ११ हजार ३६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी सीबीआयनं दोन गुन्हे दाखल केले आहेत. पहिला गुन्हा २९ जानेवारीला नोंदवण्यात आला होता. त्यात नीरव मोदी व इतर आरोपींनी २८० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. प्रत्यक्षात या प्रकरणातील फसवणूक सहा हजार कोटींची असल्याचे सीबीआयच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय मेहुल चोक्‍सी व इतर आरोपींवर ४८८६ कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा नोंदवण्यात आला होता.


हेही वाचा - 

वाचा ‘कसा’ झाला 'पीएनबी'चा महाघोटाळा

‘पीएनबी’च्या गुंतवणूकदारांचं ९ हजार कोटींचं नुकसान

पुढील बातमी
इतर बातम्या