Advertisement

वाचा ‘कसा’ झाला 'पीएनबी'चा महाघोटाळा

पीएनबी बँकेचा महाघोटाळा २०११ मध्ये झाल्याचं म्हटलं जात असलं, तर त्याला बाहेर यायला तब्बल ७ वर्षे का लागली, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. याचा खुलासा नुकताच पीएनबीचे एमडी सुनील मेहता यांनी केला. तपासातून आणखी माहिती उघडकीस होण्याची शक्यता आहे. यांत प्रामुख्याने हिरे व्यापारी नीरज मोदीचं नाव पुढं येत आहे. पण नेमका त्याने हा घोटाळा केला कसा? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यामुळे बँकेने दिलेल्या माहितीनुसार या घोटाळ्याच्या प्रकारावर एक नजर टाकूया.

वाचा ‘कसा’ झाला 'पीएनबी'चा महाघोटाळा
SHARES

देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक अशी ओळख असलेल्या पंजाब नॅशनल बँकेत ११, ३३० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकेच्या खातेधारकांमध्ये एकच खळबळ उडाली. हा घोटाळा २०११ मध्ये झाल्याचं म्हटलं जात असलं, तर त्याला बाहेर यायला तब्बल ७ वर्षे का लागली, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. याचा खुलासा नुकताच पीएनबीचे एमडी सुनील मेहता यांनी केला. तपासातून आणखी माहिती उघडकीस होण्याची शक्यता आहे. यांत प्रामुख्याने हिरे व्यापारी नीरज मोदीचं नाव पुढं येत आहे. पण नेमका त्याने हा घोटाळा केला कसा? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यामुळे बँकेने दिलेल्या माहितीनुसार या घोटाळ्याच्या प्रकारावर एक नजर टाकूया.


‘एलओयू’चा 'असा' केला वापर

हा घोटाळा पीएनबीच्या फोर्टमधील ब्रॅडी हाऊस शाखेत झाल्याचं म्हटलं जात आहे. सर्व घोटाळा लेटर आफ अंडरटेकींग(एलओयू)च्या अंतर्गत सुरू होता. या अंतर्गत एका बँकेच्या गॅरंटीवर दुसरी बँक खातेधारकांना रक्कम पुरवते. ‘पीएनबी’च्या ‘एलओयू’चा वापर करून खातेधारकांनी युनियन बँक, बँक आॅफ इंडिया, अॅक्सिस बँक आणि इलाहाबाद बँकेकडून मोठ्या रक्कमेची कर्ज उचलली. यांत प्रामुख्याने ज्वेलरी उद्योजक नीरव मोदी, त्याचा भाऊ निशाल मोदी, पत्नी अमी मोदी आणि आणि पार्टनर मेहूल चोकसी यांच्या खात्याचा समावेश आहे. या सर्वांच्या खात्याद्वारे परदेशात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आले. शिवाय नीरव मोदीच्या मध्यस्तीने काही ठराविक खातेधारकांना ‘एलओयू’ मिळाल्याचं म्हटलं जात आहे.


कुठल्या बँकेचं किती नुकसान?

  • इलाहाबाद बँकेचे ४ हजार कोटी रुपये
  • अॅक्सिस बँकेचे २ ते ३ हजार कोटी रुपये
  • युनियन बँकेचे १ ते २ हजार कोटी रुपये


पीएनबीने सर्व बँकांना पत्र पाठवून अशा प्रकारच्या संशयास्पद व्यवहारावर लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे.


‘स्विफ्ट’च्या फोलपणाचा फायदा

हे ‘एलओयू’ बँकेच्या अधिकाऱ्यांनीच खातेधारकांना उपलब्ध करून दिले. त्या आधारे खातेधारकांनी वर नमूद केलेल्या बँकांकडून मोठी रक्कम कर्जाच्या स्वरूपात मिळवली आणि रक्कम घेऊन खातेधारक पसार झाले. हा फ्राॅड लपवण्यासाठी प्रामुख्याने ग्लोबल फायनांन्शिअल मॅसेजिंग सर्व्हिस (स्विफ्ट)चा वापर करण्यात आला. या अंतर्गत भारतीय बँकांच्या परदेशातील शाखांना खातेधारकांना रक्कम पुरवण्याबाबत नोट्स काढण्यात आल्या.

परदेशात कर्ज मिळवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘स्विफ्ट’ सिस्टिम अंतर्गत तयार होणारे मॅसेज पंजाब नॅशनल बँक वापरत असलेल्या फिनॅकल सॅफ्टवेअर सिस्टिममध्ये त्वरीत उपलब्ध होत नाहीत. कारण हे मॅसेज बँकेच्या कोअर बँकिंग सिस्टिम (सीबीएस)मध्ये एण्ट्री केल्याशिवाय पाठवले जातात.


कुठे टाकले छापे?

आतापर्यंत सीबीआय आणि 'ईडी'ने ज्वेलरी उद्योजक नीरव मोदी याचं घर आणि कार्यालय अशा १० ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये कुर्ल्यातील घर, काळा घोडा इथलं ज्वेलरी बुटीक, वांद्रे आणि परळ इथल्या ३ कंपन्या, सूरतमधील ३ कार्यालय आणि दिल्लीच्या चाणक्यपुरी तसंच डिफेन्स काॅलनीतील शोरूमचा समावेश आहे. सीबीआयकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार 'ईडी'ने मनी लाॅन्ड्रिंग अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. शिवाय याप्रकरणी बँकेच्या असिस्टंट जनरल मॅनेजरसहित २२ कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. 


ज्वेलरी ब्रँड रडारवर

पीएनबी बँक घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी ब्रँडसोबतच गीतांजली ज्वेलर्स, गिन्नी आणि नक्षत्र हे नामांकीत ज्वेलरी ब्रँड्सदेखील तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. कारण या सर्व ब्रँड्ससोबत नीरव मोदी याचा व्यवहार असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाच्या फायनांन्शिअल सर्व्हिस डिपार्टमेंटचे सचिव राजीव कुमार यांनी दिलं. याप्रकरणी अर्थ मंत्रालयाने बँकेकडून सर्व तपशील मागवला आहे. नीरज मोदीनं पीएनबीला 'लोन रिपेमेंट'चा प्लानही सादर केला होता. पण हा प्लान अर्धवट असल्याची माहिती पीएनबीचे एमडी सुनील मेहता यांनी दिली.



हेही वाचा-

घोटाळेबाजांना सोडणार नाही- सुनील मेहता

पीएनबीत ११ हजार कोटींचा घोटाळा, गुंतवणूकदारांचे ३ हजार कोटी पाण्यात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा