महाव्यवस्थापकांनी टाटा मुंबई (mumbai) मॅरेथॉन - 2025 (Tata Marathon 2025) मध्ये मध्य रेल्वेच्या 200 हून अधिक सहभागींसह सहभाग घेतला, ज्यात मध्य रेल्वेच्या (central railway) खेळाडू, विभाग प्रमुख, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश होता.
यात त्यांनी फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, 10 किमी आणि ड्रीम रन अशा विविध श्रेणींच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.
रेल्वे संरक्षण दलाचे महासंचालक मनोज यादव हे 50 आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या पथकासह मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले. मरीन ड्राइव्ह प्रोमेनेडवरील आरपीएफ बँडने धावपटूंना प्रोत्साहन दिले आणि रेल्वे सुरक्षेबद्दल जागरूकता वाढवली.
भारतीय रेल्वे खेळाडू नेहमीच मॅरेथॉन (Tata Mumbai Marathon) स्पर्धांमध्ये आघाडीवर राहिले आहेत. या वर्षी देखील भारतीय रेल्वे खेळाडूंनी अनेक स्पर्धांमध्ये विजयी पताका रोवला आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या सोनिका परमारने दुसरे स्थान मिळवत रौप्य पदक जिंकले. तसेच मध्य रेल्वेच्या नागपूर (nagpur) विभागातील एलएम लक्ष्मीने 42.195 किमी धावत पूर्ण मॅरेथॉनमध्ये चौथे स्थान मिळवले.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीणा यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच मनापासून सहभाग घेतल्याबद्दल मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले.
हेही वाचा