Advertisement

सहा दिवसांत 275 बांगलादेशींना अटक

बेकायदेशीरपणे सीमा ओलांडल्यानंतर ते बनावट कागदपत्रे बनवतात आणि देशात राहून भारतीय नागरिक असल्याचे भासवतात.

सहा दिवसांत 275 बांगलादेशींना अटक
SHARES

गेल्या सहा दिवसांत मुंबई (mumbai) पोलिसांनी 275 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे जानेवारीपासून ताब्यात घेतलेल्या बेकायदेशीर बांगलादेशींची संख्या सुमारे 650 झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, बेकायदेशीर बांग्लादेशींविरोधात 350 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

देशात बेकायदेशीरपणे (illegal) राहणाऱ्या बांगलादेशींना (bangladeshi) ओळखून ते देशाबाहेर पाठवण्याच्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अलिकडच्या अधिसूचनेच्या पार्श्वभूमीवर, सुमारे 200 बांगलादेशींना हद्दपार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

"या अधिसूचनेत विशेषतः बांधकाम स्थळे, वेश्याव्यवसाय ठिकाणे, घरकाम करणारे आणि खानपान सेवांमध्ये काम करणाऱ्या महिला आणि पुरुषांचा उल्लेख आहे," असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

अटक केलेले बहुतेक बांगलादेशी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि ते मजूर म्हणून काम करतात, असे ते म्हणाले. बेकायदेशीरपणे सीमा ओलांडल्यानंतर ते बनावट कागदपत्रे बनवतात आणि देशात राहून भारतीय नागरिक असल्याचे भासवतात.

2024 मध्ये भारताच्या परदेशी प्रादेशिक नोंदणी अधिकाऱ्यांनी (FRRO) 2,331 परदेशी लोकांना हद्दपार केले होते. त्यापैकी 411 बांगलादेशी नागरिक होते. नायजेरियन निर्वासितांची संख्या 1,470 इतकी होती.

जानेवारीमध्ये अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केल्याबद्दल मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला अटक करण्यात आल्यानंतर मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

त्यानंतर मुंबईd पोलिसांनी (mumbai police) केलेल्या अनेक कारवायांमध्ये बांग्लादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. तसेच काहींना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्यात आले. 



हेही वाचा

मेट्रो लाईन 3 10 मे पासून प्रवाशांसाठी खुली होणार

बेस्ट बसच्या तिकीटदरात वाढ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा