Advertisement

घोटाळेबाजांना सोडणार नाही- सुनील मेहता


घोटाळेबाजांना सोडणार नाही- सुनील मेहता
SHARES

पंजाब नॅशनल बँके(पीएनबी)त २०११ मध्ये झालेला ११ हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा बँकेनेच उघडकीस आणला असून या घोटाळ्यात सहभागी सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. सोबतच बँकेच्या सर्व खातेधारकांचे पैसे सुरक्षित असून बँकेला कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचा खुलासा ‘पीएनबी’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी केला. आर्थिक घोटाळा प्रकरणाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मेहता यांनी ही माहिती दिली.


काय म्हणाले मेहता?

पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या या घोटाळ्याची सुरूवात २०११ मध्ये झाली होती. पारदर्शक व्यवहारासाठी बँक कटीबद्ध असल्याने या गैरव्यवहाराचा छडा लागताच बँकेने तात्काळ तपास यंत्रणांना कळवलं.
या घोटाळ्यात बँकेचे कर्मचारीही सामील असल्याने आम्ही घोटाळेबाज खातेधारकांसोबतच त्यांच्यावरही कठोर कारवाई करणार आहोत. बँकेला १२५ वर्षांची परंपरा असून सर्व परिस्थिती हाताळण्यास बँक सक्षम आहे.


घोटाळा उघडकीस येण्यास ७ वर्षे का लागली?

  • या प्रश्नाचं उत्तर देताना मेहता म्हणाले की, जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. जेव्हा आमच्याकडे या खात्यांचा तपशील आला. तपास यंत्रणांना या बाबत जर आमची चूक झाल्याचं वाटत असंल, तरी ती स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत.
  • आम्हाला या घोटाळ्याची माहिती ३ जानेवारीला लागली. यासंदर्भात माहिती घेत असताना घोटाळ्यात सहभागी एक खातेदार २५ जानेवारी रोजी आपल्या खात्याच्या नूतनीकरणासाठी आल्यावर घोटाळ्याची व्याप्ती आम्हाला कळाली.
  • हा घोटाळा फक्त बँकेच्या एकाच शाखेतून झाला आहे. शिवाय हे सर्व गैरव्यवहार भारतीय बँकांच्या परदेशी शाखांतून झाले.
  • त्याच्या व्यवहारांची पडताळणी केल्यावर २९ जानेवारीला आम्ही सीबीआयकडे यासंदर्भात तक्रार केली. सीबीआयने ३१ जानेवारीला तक्रार नोंदवून घेतली.
  • याच दरम्यान १ जानेवारीला नीरव मोदी भारताबाहेर पळाल्याने सीबीआयने त्याच्या नावाची लूकआऊट नोटीस काढली.
  • या सर्व गैरव्यवहारांमध्ये बँकेचे गोकुळनाथ शेट्टी आणि मनोज खरात असे २ कर्मचारी सहभागी असल्याने त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
  • सध्या तरी नीरव मोदीकडून पैसे परत घेण्याचा कुठलाही अॅक्शन प्लान बँकेकडं तयार नाही.हेही वाचा-

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरण : नीरव मोदीच्या घरी ईडीचे छापेRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा