Advertisement

‘पीएनबी’च्या गुंतवणूकदारांचं ९ हजार कोटींचं नुकसान


‘पीएनबी’च्या गुंतवणूकदारांचं ९ हजार कोटींचं नुकसान
SHARES

पंजाब नॅशनल बँके (पीएनबी)चा ११ हजार ३३० कोटी रुपयांचा घोटाळा समोर आल्यापासून सलग ३ दिवस ‘पीएनबी’च्या शेअर्समध्ये मोठी घसरण सुरू आहे. मागील ३ दिवसांचा आढावा घ्यायचा झाल्यास ‘पीएनबी’च्या शेअर्समध्ये २३.६० टक्क्यांची घसरण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे किमान ९ हजार २४६.१९ कोटी रुपये पाण्यात गेल्याचा अंदाज आहे.

शुक्रवारी देखील पीएनबीच्या शेअर्समध्ये ३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. एवढंच नव्हे, तर या घोटाळ्यात ज्वेलरी ब्रँड गीतांजली जेम्सचं नाव पुढं आल्यावर या कंपनीच्या शेअर्समध्येही घसरण होत असल्याने गुंतवणूकदारांचे किमान ३०० कोटी रुपये बुडाल्याचं म्हटलं जात आहे.


‘असं’ झालं नुकसान

काही ठराविक खातेधारकांना फायदा पोहोचवण्याच्या उद्देशाने लेटर आफ अंडरटेकींगद्वारे (एलओयू) ११, ३३० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं बँकेने मुंबई शेअर बाजाराला बुधवारी कळवताच ‘पीएनबी’चे शेअर्स ७.८२ टक्क्यांनी खाली कोसळून १४५.८० रुपयांवर आले. यामुळं गुंतवणूकदारांचं ३ हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं.

या घोटाळ्याची व्याप्ती समोर येताच दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरूवारी पीएनबीचे शेअर्स तब्बल ११.९९७ टक्क्यांनी घसरुन १२८.३५ रुपयांवर आले. यामुळं गुंतवणूकदारांचं ८ हजार ७५६.३६ कोटी रुपयांचं नुकसान झालं. तर तिसऱ्या दिवशी पीएनबीचे शेअर्स २.१० टक्क्यांनी घसरून १२५.६५ रुपयांवर आले.


मार्केट कॅप 'अशी'

  • १२ फेब्रुवारी ३९१७८.१७ कोटी रुपये
  • १४ फेब्रुवारी ३५३३६.७० कोटी रुपये
  • १५ फेब्रुवारी ३११०७.४४ कोटी रुपये
  • १६ फेब्रुवारी २९९३१.९८ कोटी रुपये


‘गीतांजली’चं ३०० कोटींचं नुकसान

गीतांजली जेम्स लि. चे मालक मेहुल चोकसी याचं नाव पीएनबी घोटाळ्याशी जोडलं गेल्यानंतर या कंपनीचे शेअर्सही धाडकन कोसळले. मागच्या ३ दिवसांमध्ये कंपनीच्या शेअर्स ४० टक्क्यांहून जास्त कोसळले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांच्या किमान ३०० कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. १२ फेब्रुवारी रोजी या कंपनीची मार्केट कॅप ७४५.४९ कोटी रुपये होती. ती घटून १६ फेब्रुवारीपर्यंत ४४५.४० कोटी रुपयांपर्यंत आली आहे.


मार्केट कॅप 'अशी'

  • १२ फेब्रुवारी ७४५.४९ कोटी रुपये
  • १४ फेब्रुवारी ६९५.०८ कोटी रुपये
  • १५ फेब्रुवारी ५५६.३० कोटी रुपये
  • १६ फेब्रुवारी ४४५.४० कोटी रुपयेहेही वाचा- 

नीरव मोदीची ५,१०० कोटींची मालमत्ता जप्त, मुंबईतल्या ४ मालमत्तांचा समावेश

वाचा ‘कसा’ झाला 'पीएनबी'चा महाघोटाळाRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा