सायबर चोरट्याचा महिलेला ४० हजारांचा गंडा

आॅनलाइन विक्री करणं वरळीतील एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑनलाईन  विकण्यासाठी एका मार्केटिंग अॅपवर महिलेने जाहिरात दिली होती. ह्या वस्तू खरेदी करण्याची इच्छा दर्शवत एका सायबर चोरट्याने महिलेला ४० हजार रुपयांचा गंडा घातला. 

वरळीच्या उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या महिलेने काही दिवसांपूर्वी तिच्या घरातील वॉशिंग मशीन , मिक्सर, टोस्टर आणि वॉटर फिल्टर विकण्याची जाहिरात एका अॅपवर दिली होती. ही जाहिरात पाहून अनिल शर्मा नावाच्या व्यक्तीने ते साहित्य घेण्याची इच्छा दर्शवत महिलेशी संपर्क साधला. १४ ऑक्टोबरला महिलेने शर्मा याच्यासोबत फोनवर ऑनलाईन वस्तू विकण्याबाबत बोलणी केली.  शर्मा याने माझे वापरलेल्या वस्तू विकण्याचं दुकान असल्याचं सांगितलं. तसंच तुम्ही ऑनलाईवर पोस्ट केलेल्या वस्तू विकल्या गेल्याचं मार्क करण्यास महिलेला सांगितलं. 

 गुरुवारी महिलेने या सर्व वस्तूंसाठी किती रुपये देण्यात येणार याबद्दल शर्मा याला विचारले. त्यावर त्याने २० हजार रुपये सांगत वस्तूंचे पैसे गुगल पे वरून पाठवतो असं सांगितलं म्हटले. मात्र,महिलेने मी गुगल पे वापरत नसल्याचे शर्मा याला सांगितलं.  यावर शर्मा याने मी तुम्हाला मदत करतो असं सांगत १० रुपये तिला पाठवत एक बारकोडही पाठवला. महिलेने बारकोड स्कॅन केल्यानंतर तिच्या बँक खात्यामधून २० हजार रुपये दोन वेळेस कापले गेल्याचा मेसेज मोबाइलवर आला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर महिलेने दादर पोलिसात तक्रार दाखल केली.


हेही वाचा -

पीएमसी घोटाळा : चेक न वटवताच दिले १०.५ कोटी

'पीएमसी'बाबत मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी


पुढील बातमी
इतर बातम्या