Coronavirus infiltrates 32 police quarters मुंबईतल्या ३२ पोलिस वसाहतींमध्ये कोरोनाचे रुग्ण

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव जरी नियंत्रणात आला असला. तरी कोरोना बाधितांची संख्या ही काही कमी होण्याचे नाव घेत नाही. नागरिकांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलिस ही या महामारीने त्रस्त आहेत. राज्यातील १ हजार ३४ पोलिस हे सध्या कोरोनाने त्रस्त आहेत. तर सेल्प क्वारनटाईन पोलिसांच्या संख्याही तितकीच आहे. मुंबईतल्या ३२ पोलिस वसाहतींमध्ये कोरोनाचे रुग्ण  आतापर्यंत आढळून आले आहेत.

हेही वाचाः- शिवसेना भवनातही कोरोनाचा शिरकाव; काही दिवसांसाठी सेना भवन सील

 महाराष्ट्र पोलिस दलातील ११८ अधिकारी व ९१६ पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर उर्वरित पोलिसांमध्ये कोरोनाचे अतिसौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्या पोलिसांना क्वारंटाइन  करण्यात आले आहे. यात मुंबई पोलिसांची संख्या ही सर्वाधिक आहे. त्यामुळे सहाजिकच रस्त्यावरील कोरोना पोलिसांच्या वसाहतीपर्यंत पोहचला आहे. मुंबईतील ३२ वसाहतींमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. आतपार्यंत ताडदेव पोलिस वसाहतीत सर्वाधिक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. अर्थातच ताडदेव पोलिस वसाहत ही मुंबईतील सर्वात मोठी पोलिस वसाहत म्हणून ओळखली जाते. त्या पाठोपाठ मरोळ, नायगाव, घाटकोपर आणि वरळी पोलिस वसाहतीचा नंबर लागतो. अंधेरी पोलिस वसाहतीत ही चार ते पाच इमारतीत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर फोर्ट मधील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस वसाहतीत आतापर्यंत ११ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे.

हेही वाचाः- यंदा शाडू मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, मुंबईच्या राजाचा निर्णय

यातील बहुतांश इमारतीत शौचालयं ही सार्वजनिक असल्याने पालिकेच्या नियमानुसार संपूर्ण इमारत सील केली जात असल्याचे सांगितले जात आहे.   मुंबईत आतापर्यंत २३९५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १६६७ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या पोलिसांचा आकडे ६५ टक्क्यांहून अधिक आहे. त्यातील ७२२ जण कर्तव्यावर पुन्हा रूजू झाले आहे. २८२ पोलिस उपचारानंतर सध्या घरी आहेत, तर ६६३ पोलिस लवकरच कर्तव्यावर रूजू होणार आहेत.   मुंबईत पोलिसांसाठी चार कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये ४५२ पोलिस  उपचार घेत आहेत. तर २०५ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यता आले आहे. याशिवाय ३५ पोलिसांना विलगीकरणार ठेवण्यात आले आहे. याशिवाय इतर प्रतिबंधात्मक साहित्य व औषधांचे वाटपही पोलिसांना करण्यात आले आहे. याशिवाय मुंबईत कार्यरत ८२ राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनाही आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. पाच अधिकारी व ७७ जवानांचा समावेश आहे.

गुन्हे शाखेच्या सहा पोलिसांना कोरोनाची लागण

गुन्हे शाखेच्या एका कक्षातील सहा पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. या कक्षातील एका चालकाला कोरोना झाल्याचे १७ जूनला आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले होते. त्यानंतर ११ अधिकारी व कर्मचारी विलगीकरणार गेले होते. त्यानंतर या कक्षातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह सहा जणांना कोरोना झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. १९ जूनला हे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील पोलिस अधिकारा-यावर चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात, तर पाच पोलिसांवर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्या चालकावर वांद्रे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या