Coronavirus Infected police कोरोनामुळे आतापर्यंत राज्यातील ५१ पोलिस शहिद

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून अत्यावश्य सेवा बजावणाऱ्या अनेक कर्मचारी या माहामारीपासून वाचू शकलेले नाही. दुर्दैवाने या महामारीत आतापर्यंत राज्यातील तब्बल ५१ पोलिसांचा मृत्यू झालेला आहे.  तर आज ही ९९८ पोलिस हे कोरोनाशी लढा देत आहेत. यात सर्वाधिक मृत्यू हे मुंबई पोलिस दलातील पोलिसांचे आहेत.

हेही वाचाः- dahi handi festival: यंदा थर लागणार नाहीत, दहीहंडीवर करोनाचं सावट

कोरोना या महामारीपासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी अत्यावश्य सेवेच्या खांद्याला खांदा लावून पोलिस ही रस्त्यावर उतरलेत, नागरिकांच्या थेट संपर्कात आल्याने आज या महामारीने संपूर्ण पोलिस दल त्रस्त आहेत. अशातच एका मागोमाग एक आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूने संपूर्ण पोलिस दलात असंतुष्ठ होत आहे. नुकतीच मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या ५६ वर्षीय पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. या महामारीत कोरोना ५० वर्षावरील नागरिकांसाठी घातक असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस आयुक्तांनी ५५ वर्षावरील नागरिकांना घरी राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहिद पोलिस हे घरीच असताना. दोन आठवड्यापूर्वी त्यांची प्रकृती ढासाळली. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ठ झाले. वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना. अचानक त्यांची प्रकृती ढासाळली. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रावर ठेवण्यात आले होते. अखेर मंगळवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. ते नायगाव पोलिस कॉलनी येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व मुलगा असा परिवार आहे.

हेही वाचाः- Ramdev Baba : पतंजलीला नोटीस, आयुष मंत्रालयानं उचललं 'हे' कडक पाऊल

आतापर्यंत मुंबईतील दोन हजार पाचशे दहा पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील १७८५ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. ६९२ पोलिस सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत. राज्य पोलिस दलातील ४०४८ पोलिसांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील बहुसंख्या पोलिसांनी कोरोनावर मात केली असून सध्या एक हजार पोलिस सध्या उपचार घेत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या