Advertisement

dahi handi festival: यंदा थर लागणार नाहीत, दहीहंडीवर करोनाचं सावट

यंदा गोविंदा पथकांवर आणि दहिहंडी उत्सवावर कोरोनाचं सावट आलं आहे.

dahi handi festival: यंदा थर लागणार नाहीत, दहीहंडीवर करोनाचं सावट
SHARES

दरवर्षी मुंबईत दहिहंडी उत्सवाच्या २ महिनेआधी थरांच्या सरावाला सुरूवात होते. 'बोल बजरंग बली की जय' अशा आरोळ्या देत थर रचले जातात. दहिहंडीच्या दिवशी आयोजकांनी लावलेली मोठ-मोठी बक्षिस जिंकण्यासाठी ही गोविंदा पथकांची धडपड असते. परंतु, यंदा गोविंदा पथकांवर आणि दहिहंडी उत्सवावर कोरोनाचं सावट आलं आहे. मुंबईतील कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता दहीहंडी उत्सव समन्वय समितीनं यंदा उत्सव साजरा करू नये, असं आवाहन गोविंदा पथकांना केलं आहे.

दहीहंडीची तयारी म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी मानवी मनोरे रचण्याच्या सरावाला सुरुवात होते. रात्रीचा जागर करीत मुंबईतील गल्लीबोळातील तमाम गोविंदा पथकांतील तरुण मंडळी थर रचण्याचा सराव करीत असतात. गोपाळकाल्याच्या दिवशी गल्लीबोळातील गोविंदा पथकं वाजतगाजत, दहीहंड्या फोडत मुंबई, ठाण्यात फिरत असतात. यंदा १२ ऑगस्ट रोजी दहीहंडी आहे. पण गोविंदा पथकं उत्सव साजरा करायचा की नाही याबाबत कोणताच निर्णय घेऊ शकलेली नाहीत. अनेक पथकांतील गोविंदांचं लक्ष सरकारच्या निर्णयाकडं आहे.

सरकारनं अद्याप कोणतीच भूमिका घेतलेली नाही. तर सरकार जो काही निर्णय घेऊन त्याचं पालन करण्याची भूमिका काही पथकांनी घेतली आहे. कोरोनामुळं नागरिकांना मदतीची गरज आहे. विभागातील, तसंच आदिवासी पाड्यातील गरजूंना अन्नधान्य वाटप, र्निजतुकीकरण आदी मदतकार्यामध्ये पथकातील गोविंदा व्यग्र आहेत.

दहीहंडी उत्सवात प्रत्यक्ष सहभागी होणारे आणि तो बघणारे अशी प्रचंड गर्दी होते. आता गर्दी होणे योग्य नाही. त्यामुळे यंदा दहीहंडी उत्सव साजरा करू नये, असे आवाहन मुंबईतील समस्त गोविंदा पथकांना करण्यात आले आहे. पथकांनी स्थानिक पातळीवर सामाजिक अंतराच्या नियमाचं पालन करीत जन्माष्टमीची पूजा करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

Ramdev Baba : पतंजलीला नोटीस, आयुष मंत्रालयानं उचललं 'हे' कडक पाऊल

Salon And Beauty Parlor: सलून, ब्युटी पार्लर लवकरच सुरू करणार, ‘या’ मंत्र्याने दिली माहिती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा