क्रिस्टल आग प्रकरण: सुपारीवाला बिल्डरला २ आठवड्यांची न्यायालयीन कोठडी

परळ येथील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीप्रकरणी बिल्डर अब्दुल रज्जाक इस्माइल सुपारीवाला याला मुंबई उच्च न्यायालयानं २ आठवड्यांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आगीप्रकरणी अब्दुल रज्जाकला बुधवार २२ ऑगस्ट रोजी रात्री अटक करण्यात आली होती. गुरुवारी २३ ऑगस्ट रोजी भोईवाडा न्यायालयात हजर केल्यावर त्याला २७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

कुठल्या कारणाखाली अटक?

क्रिस्टल टॉवर इमारतीला मुंबई महापालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळालं नव्हतं. त्याचप्रमाणं अग्निरोधक यंत्रणाही बंद ठेवण्यात आली होती. इमारतीचं इलेक्ट्रीक डक्ट सील केलं नव्हतं. त्यामुळं काही क्षणातचं आगीवं रौद्र रुप घेतल्याचा दावा रहिवाशांनी केला होता. या सर्व आरोपांच्या आधारे पोलिसांनी बिल्डर अब्दुल रज्जाकला अटक केली.

कधी लागली होती आग?

क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्यावर बुधवारी सकाळी ८.४५ सुमारास भीषण आग लागली. या आगीवर दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला यश आलं होतं. तसंच त्यावेळी इमारतीमधील १० ते १२ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली होती. परंतू या आगीत ४ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.


हेही वाचा-

Exclusive: सोसायट्यांनो सावधान! अग्निरोधक यंत्रणा नादुरूस्त असल्यास वीज-पाणी कापणार

क्रिस्टल टॉवर आग: स्वरक्षणाचे धडे आले कामी, सहावीच्या विद्यार्थिनीने वाचवले १७ जणांचे प्राण


पुढील बातमी
इतर बातम्या