क्रिस्टल टाॅवर आग: सुपारीवाला बिल्डरला २७ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी

भोईवाडा पोलिसांनी बिल्डर अब्दुल रज्जाक इस्माइल सुपारीवाला याच्या विरोधात गुन्हा दाखल त्याला बुधवारी मध्यरात्री अटक केली. भोईवाडा पोलिसांनी अब्दुलला भोईवाडा न्यायालयात हजर केलं असता. न्यायालयाने त्याला २७ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

  • क्रिस्टल टाॅवर आग: सुपारीवाला बिल्डरला २७ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी
SHARE

परळ येथील क्रिस्टल टाॅवर इमारतीला लागलेल्या आगीप्रकरणी बिल्डर अब्दुल रज्जाक इस्माइल सुपारीवाला याला पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली होती. यानंतर अब्दुल याला पोलिसांनी गुरूवारी दुपारी भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने सुपारीवाला याला २७ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती झोन ४ च्या पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांनी दिली.


आगीचं कारण अस्पष्टच

परळमधील क्रिस्टल टॉवरमध्ये आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. टॉवरच्या १२ व्या मजल्यावर ही आग लागली. जवळपास २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र या आगीत ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर १८ जण जखमी झाले. शिवाय आग विझवताना ५ अग्निशमन दलाचे कर्मचारीही जखमी झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अजूनही समजू शकलेलं नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा स्थानिकांचा दावा आहे.रहिवाशांचा आरोप

५ वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीला मुंबई महापालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळालेलं नव्हतं तसंच बिल्डरने अग्निरोधक यंत्रणा जाणीवपूर्वक बंद ठेवली होती. इमारतीचं इलेक्ट्रीक डक्ट सील केलं नव्हते. त्यामुळे आग फोफावत जाऊन आगीने काही क्षणात रौद्र रुप धारण केल्याचा दावा रहिवाशांना केला.


गुन्हा दाखल

त्यानुसार भोईवाडा पोलिसांनी बिल्डर अब्दुल रज्जाक इस्माइल सुपारीवाला याच्या विरोधात गुन्हा दाखल त्याला बुधवारी मध्यरात्री अटक केली. भोईवाडा पोलिसांनी अब्दुलला भोईवाडा न्यायालयात हजर केलं असता. न्यायालयाने त्याला २७ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती झोन ४ च्या पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांनी दिली.हेही वाचा-

क्रिस्टल टाॅवर आग: 'त्याच्या' ईदच्या शुभेच्छा ठरल्या अखेरच्या

क्रिस्टल टॉवर आग: स्वरक्षणाचे धडे आले कामी, सहावीच्या विद्यार्थिनीने वाचवले १७ जणांचे प्राणसंबंधित विषय
ताज्या बातम्या