SHARE

परळ येथील क्रिस्टल इमारतीत लागलेल्या आगीप्रकरणी विकासक अब्दुल रज्जाक इस्माइल सुपारीवालाला बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. इमारतीला ओसी नसताना रहिवाशांना जिव धोक्यात टाकून इमारतीत राहण्याची परवानगी दिल्याप्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केल्यानंतर विकासकाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांनी दिली.


चौघांचा मृत्यू

परळमधील क्रिस्टल टॉवरमध्ये आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली असून टॉवरच्या १२ व्या मजल्यावर ही आग लागली. जवळपास दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. इमारतीत अडकलेल्या १० ते १२ जणांची सुटका करण्यात आली खरी मात्र आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला.


पोलिसांचा तपास सुरू

ही आग नेमकी कशामुळे लागली हे अजूनही समजू शकलेलं नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा स्थानिकांचा दावा आहे. तर पाच वर्षांपूर्वी नियमांचं उल्लंघन करत या इमारतीचं बांधकाम झाल्याचं उघड झालं. शिवाय या इमारतीला पालिकेकडून ओसी अर्थात भोगवटा प्रमाणपत्र मिळालं नव्हतं, तसंच बिल्डरने अग्निरोधक यंत्रणाही बसवलेली नाही.

त्यामुळे घडलेल्या दुर्घटनेत नागरिक दगावल्यानं कारणीभूत म्हणून भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर विकासक अब्दुल रज्जाक इस्माइल सुपारीवाला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


हेही वाचा - 

क्रिस्टल टॉवर आग: स्वरक्षणाचे धडे आले कामी, सहावीच्या विद्यार्थिनीने वाचवले १७ जणांचे प्राण

क्रिस्टल टाॅवर आग: धुरानं केला आईचा घात

संबंधित विषय
ताज्या बातम्या