Advertisement

क्रिस्टल टाॅवर आग: धुरानं केला आईचा घात


क्रिस्टल टाॅवर आग: धुरानं केला आईचा घात
SHARES

परळच्या एफ दक्षिण कार्यालयासमोरील क्रिस्टल टाॅवर या १६ मजली इमारतीतील १२ व्या मजल्याला ८.३० च्या सुमारास आग लागली. अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असून त्यात शुभदा शिर्के (६२) यांचाही समावेश आहे. सकाळच्या सुमारास नेमकं काय झालं? याबाबत शिर्के यांच्या मुलीने शरयू शिर्के यांनी दिलेली ही माहिती.


काय घडलं सकाळी?

सकाळी ८ च्या सुमारास मला माझ्या आईने फोन केला. मी कामाला जाण्याच्या गडबडीत असल्यानं घाईत फोन उचलला. त्यावेळी आईचा आवाज घाबरल्यासारखा वाटला. आई रडतच सांगत होती, बाळा आग लागली आहे बिल्डिंगला... कुठे लागली असं मी विचारताच, तिने पटकन सांगितलं की लॉबीमध्ये...


धुराने घात केला

मी तिला त्वरीत घरातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आणि मी पोहोचते घरी असं सांगून तिचा फोन कट केला. मी सांगितल्याप्रमाणे ती घराबाहेर तर पडली, पण दुर्दैवाने तिला मजल्यावरून बाहेर निघता आलं नाही. कारण तिथं प्रचंड धूर झाला होता. या धुरातच गुदमरून तिचा मृत्यू झाला.


फोन लागला नाही

मी बिल्डिंगखाली पोहोचल्यानंतर आईला फोन केला. परंतु फोन लागला नाही. त्यानंतर मी जवळच्या पोलिसांकडे चौकशी केल्यानंतर मला आईला केईएम रुग्णालयात नेण्यात आल्याचं समजलं. मी लगेच केईएममध्ये धाव घेतली. परंतु तोपर्यंत आई या जगात नव्हती.

या आगीत जखमी झालेल्या २० जणांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला असून त्यात शुभदा शिर्के आणि बबलू शेख यांचा समावेश आहे. तर उर्वरित दोन जणांचे मृतदेह डिएनए टेस्टसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.



हेही वाचा-

परळमधील क्रिस्टल टॉवरमध्ये लागलेल्या भीषण आगीत चौघांचा मृत्यू

कमला मिल आग दुर्घटना: चौकशी समितीवर १८ लाखांचा खर्च



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा