वजन कमी करण्याच्या गोळ्यांनी तरुणीचा मृत्यू

वजन कमी करण्यासाठी बंदी असलेल्या गोळ्या (tablet)  खाणं ठाण्यातील एका तरूणीच्या जीवावर बेतलं आहे. गोळ्या खाल्ल्यानंतर मेघना देवगडकर  (Meghna Devgadkar) या २२ वर्षीय तरूणीचा काही तासातच मृत्यू (death) झाला. मेघना डान्सर असून एका जीममध्ये ट्रेनरही आहे.

सोमवारी जीमला जाण्याआधी मेघनाने बंदी असलेल्या डिनिट्रोफेनॉल (Dinitrophenol) ह्या गोळ्या (tablet) घेतल्या. त्यानंतर थोड्याच वेळात तिला उलट्या झाल्या. त्यामुळे तिला डाॅक्टरकडं नेण्यात आलं. तिथून तिला लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर तिथूनही तिला सायन हॉस्पिटल (Sion Hospital) मध्ये नेण्यात आलं. सायन हॉस्पिटलमध्ये मेघनाला आयसीयूमध्ये शिफ्ट केले. पण तिचा हृदयाची गती थांबल्याने  मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात मेघनाने पोलिसांना वर्क आऊटपूर्वी डिनिट्रोफेनॉल ही गोळी घेतल्याचं सांगितलं. 

डिनिट्रोफेनॉल (Dinitrophenol) गोळी घेतल्यानंतर तिच्या शरीराचं तापमान अचानक वाढायला लागलं. त्याचबरोबर रक्तदाब आणि हृदयाचे ठोकेही वाढल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.  डॉक्टरांनी मेघनाचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टने झाल्याचं सांगितलं. गोळ्या घेतल्यानंतर पंधरा तासांच्या आत मेघनाचा मृत्यू झाला.


हेही वाचा -

भंगारातल्या रिक्षा मुंबईच्या रस्त्यावर, अन् ...

एलबीएस मार्गावरील ६१ बांधकामे जमीनदोस्त


पुढील बातमी
इतर बातम्या