भंगारातल्या रिक्षा मुंबईच्या रस्त्यावर, अन् ...

रिक्षा चोरीला जाण्याच्या घटनांना आळा घालण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी दिल्यानंतर उपनगरातील पोलिस ठाण्यांनी परिसरातील उभ्या रिक्षा स्टॅड येथे गस्त वाढवली.

भंगारातल्या रिक्षा मुंबईच्या रस्त्यावर, अन् ...
SHARES

मुंबईच्या उपनगरात चोरीच्या रिक्षा दुसऱ्याला तिसऱ्याच नंबूर विकून काळाबाजार करणाऱ्या टोळीचा बोरिवलीच्या एमएचबी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रवि पापा खारवा (३५), संजय चौरसिया (३८), सईद अहमद अजीज  उल्ला सईद या तिघांना अटक केली आहे. या तिघांकडून पोलिसांनी तब्बल चोरीच्या ११ रिक्षा हस्तगत केल्या आहेत. तर या पूर्वी या तिघांनी १२ चोरीच्या रिक्षांची विक्री केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. 

हेही वाचाः- ​सरकारी बँकांचा पुन्हा संप, 'या' ५ दिवशी कामकाज असेल ठप्प​​​

मुंबई उपनगरात रिक्षा चोरीला जाण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या, या रिक्षा चोरीला जाण्याच्या घटनांना आळा घालण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी दिल्यानंतर उपनगरातील पोलिस ठाण्यांनी परिसरातील उभ्या रिक्षा स्टॅड येथे गस्त वाढवली. मालाड, चारकोप, कांदिवली,बोरिवली आणि दहिसर परिसरात सर्वाधिक रिक्षा चोरीच्या घटनांची नोंद झाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्त वाढवून सीसीटिव्हीच्या माध्यमातून रिक्षा स्टॅडवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली. दरम्यान बोरिवली लिंक रोडवर उभ्या असलेल्या रिक्षा स्टॅडवरून रिक्षा चोरीला गेल्याची तक्रार घेऊन चालक पोलिस ठाण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत, तपासाला सुरूवात केली. त्या परिसरातील सीसीटिव्ही तपासले असता. ही रिक्षा आरोपी ऱ्या टोळीचा बोरिवलीच्या एमएचबी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रवि पापा खारवा (३५), संजय चौरसिया (३८), सईद अहमद अजीज  उल्ला सईद यांनी चोरल्याचे स्पष्ठ दिसत होते. हे तिघेही सराईत आरोपी असून पोलिसांनी त्यांना मालवणी परिसरातून अटक केली. 


हेही वाचाः- एलबीएस मार्गावरील ६१ बांधकामे जमीनदोस्त

 चोरीच्या रिक्षावरील नंबर आणि चेसी नंबर बदलून बनावट कागदपत्रांच्या मदतीने ही टोळी रिक्षा दुसऱ्यांना विकायचे. या टोळीकडून पोलिसांनी तब्बल ११ चोरीच्या रिक्षा हस्तगत केल्या आहेत. तर या पूर्वी चोरी केलेल्या १२ रिक्षांची कबूली ही आरोपींनी दिली आहे. या टोळीने या पूर्वी भंगारातल्या रिक्षा रस्त्यावर आणल्या आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा