Advertisement

एलबीएस मार्गावरील ६१ बांधकामे जमीनदोस्त

वाहतुकीला अडथळा ठरत असलेली लालबहादूर शास्त्री मार्गावरील (Lal Bahadur Shastri Marg -एलबीएस) कुर्ला (Kurla), घाटकोपर ( Ghatkopar) आणि विक्रोळी (Vikhroli) परिसरातील ६१ अवैध बांधकामेमुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पाडली.

एलबीएस मार्गावरील ६१ बांधकामे जमीनदोस्त
SHARES

वाहतुकीला अडथळा ठरत असलेली लालबहादूर शास्त्री मार्गावरील (Lal Bahadur Shastri Marg -एलबीएस)  कुर्ला (Kurla), घाटकोपर ( Ghatkopar) आणि विक्रोळी (Vikhroli) परिसरातील ६१ अवैध बांधकामे (illegal construction) मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) अतिक्रमणविरोधी पथकाने (Anti-encroachment squad) पाडली आहेत. या कारवाईमुळे एलबीएस रोड परिसरातील रस्तारुंदीकरणाचा (Road widening) मार्ग मोकळा झाला आहे. 

 या कारवाईला स्थानिक नागरिकांकडून मोठा विरोध झाला. मात्र पोलिस (police) बळाचा वापर करून हा विरोध मोडून काढण्यात आला. एलबीएस (Lal Bahadur Shastri Marg)  मार्गाचे १०० फूट रुंदीकरण (widening) करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या रस्त्यालगतच्या ८० अवैध बांधकामांमुळे (illegal construction) रुंदीकरणाची प्रक्रिया अनेक वर्षांपासून रखडली आहे. यामुळे या मार्गावरील गंगावाडी, नित्यानंद नगर, श्रेयस सिग्नल परिसरात अनेकदा वाहतूककोंडी होत होती. अवैध बांधकामे हटविण्यासाठी नऊ जेसीबींचा वापर करण्यात आला.  ७० पोलिस,  पालिकेचे १७५ कर्मचारी, अधिकारी यांनी ही कारवाई पार पाडली. 

 सायन (sion) ते थेट ठाण्यापर्यंत जाणारा पूर्व उपनगरातील एलबीएस रोड ((Lal Bahadur Shastri Margहा सर्वात मोठा रस्ता आहे. मुंबई-ठाण्यादरम्यानची वाहतूक या मार्गानेच होत असल्याने येथे सतत वर्दळ असतेपूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर उड्डाणपुलाखालून येणारी वाहने एलबीएस मार्गावर येतात. भांडुप, मुलुंड, कांजूरमार्ग, विक्रोळी, ठाणे पश्चिमेकडून या मार्गावर नेहमीच वाहतूक सुरू असते. त्यामुळे येथे नेहमी प्रचंड वाहतूककोंडी असते. मार्गाच्या दोन्ही बाजूला अधिकृत व अनधिकृत बांधकामे आहेत. अधिकृत बांधकामाच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. मधल्या काळात अनधिकृत बांधकामे वाढली. त्यामुळे तर समस्येत आणखीन भर पडली. सध्या या मार्गावर वडाळा घाटकोपर ठाणे मेट्रो-४ मार्गाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. हा मार्ग रुंद करण्याची नितांत आवश्यकता होती. 


हेही वाचा-

‘स्वच्छ भारत’ अभियानाचा बोजवारा, पालिकेला बांधता आली अवधी ८ शौचालये

आरे कारशेडसाठी पर्यायी जागा सुचवा, आदित्य ठाकरेंचं तज्ज्ञांना आवाहन




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा