Advertisement

‘स्वच्छ भारत’ अभियानाचा बोजवारा, पालिकेला बांधता आली अवधी ८ शौचालये

‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत मुंबई (mumbai) मध्ये शौचालये (Toilet) बांधण्याचं उद्दिष्ट मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) गाठता आलं नाही. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये (slum) पालिकेने अवधी ८ शौचालये बांधली आहेत.

‘स्वच्छ भारत’ अभियानाचा बोजवारा, पालिकेला बांधता आली अवधी ८ शौचालये
SHARES

 ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत मुंबई (mumbai) मध्ये शौचालये (Toilet) बांधण्याचं उद्दिष्ट मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) गाठता आलं नाही.  मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये (slum) पालिकेने अवधी ८ शौचालये बांधली आहेत. पालिकेने एका वर्षात १ हजार १६७ शौचालये बांधण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. मात्र, पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच शौचालयं बांधता आली. 

 पालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत (Swachh Bharat Abhiyan) मुंबई (mumbai) तील उघड्यावरील हागणदारीचं प्रमाण कमी करण्यासाठी११६७ शौचालये (Toilet) म्हणजेच २२ हजार शौचकूप बांधण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. यामध्ये वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत यापूर्वी बांधलेली शौचालये पाडून त्या ठिकाणी दुमजली शौचालये बांधण्यात येणार होती. काही ठिकाणी नव्याने शौचालये बांधण्यात येणार आहेत. पालिकेने यासाठी ४२२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जानेवारी २०१९ मध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.  शौचालयांच्या बांधकामांना एक वर्षाची मुदत दिली होती.  मात्र एका वर्षात पालिकेला केवळ ८ शौचालये बांधता आली आहेत. 

 आतापर्यंत केवळ ३४७ शौचालयांसाठीच कार्यादेश देण्यात आले आहेत. मात्र एक वर्ष उलटून गेले तरी यापैकी केवळ ८ शौचालये (Toilet) म्हणजेच १५९ शौचकूप बांधण्यात पालिकेला यश आलं. यापैकी दोन शौचालये दहिसर (dahisar) मध्ये, दोन शौचालये कुर्ला (kurla) आणि चेंबूर (chembur) परिसरात, चार शौचालये भांडुप (bhandup) मध्ये बांधली आहेत.


हेही वाचा -

सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करणाऱ्या सोसायट्यांना करसवलत

७३ वर्षाच्या म्हातारीलाही सुटेना जुगाराचा नाद, अट्टल जुगारीही थरथरा कापतात
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा