Advertisement

सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करणाऱ्या सोसायट्यांना करसवलत

याआधी पालिका ओला व सुका कचरा वर्गीकरण, ओला कचऱ्यातून खतनिर्मिती (Fertilizer production) करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना मालमत्ता करामध्ये ५ टक्के सवलत देत आहे.

सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करणाऱ्या सोसायट्यांना करसवलत
SHARES

सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया (Recycling of sewage) केल्यानंतर त्याचा वापर करणाऱ्या सोसायट्यांना आता मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) मालमत्ता करामध्ये (Property tax) ५ टक्के सवलत (Discount) देणार आहे. याआधी पालिका ओला व सुका कचरा वर्गीकरण, ओला कचऱ्यातून खतनिर्मिती (Fertilizer production) करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना मालमत्ता करामध्ये ५ टक्के सवलत देत आहे. त्यामुळे अनेक सोसायट्या या सवलतीचा लाभ घेण्यासाठी कचरा पुनर्प्रक्रियाकरिता पुढाकार घेत आहेत. 

मुंबई (mumbai) मध्ये  रोज हजारो किलो कचरा जमा होतो. मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) ओला व सुका कचरा वेगळा करणे तसंच दररोज १०० किलो कचरा (Garbage) निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना त्यांच्याच आवारात कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची सक्ती केली आहे. मात्र, अनेक सोसायट्यांनी याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पालिकेने कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या सोसायट्यांना आॅगस्ट २०१९ पासून मालमत्ता करामध्ये (Property tax)५ टक्के सवलत देण्यास सुरूवात केली. याचबरोबर सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाºया सोसायट्यांना मालमत्ता करात आणखी ५ टक्के सूट दिली जात आहे. 


  • सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया (
    Recycling of sewage) केल्यानंतर त्याचा वापर करणाऱ्या सोसायट्यांना आता मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) मालमत्ता करामध्ये (Property tax) ५ टक्के सवलत (Discount) देणार आहे. 
  • याआधी पालिका ओला व सुका कचरा वर्गीकरण, ओला कचऱ्यातून खतनिर्मिती (Fertilizer production) करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना मालमत्ता करामध्ये ५ टक्के सवलत देत आहे. 

 मुंबई (mumbai) मध्ये रोज ३८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. यापैकी तब्बल २ हजार दशलक्ष लीटर पाणी रोज पिण्याव्यतिरिक्त कामांवर वाया जाते.  त्यामुळे पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर नागरिकांनी केल्यास मुंबईतील पाणीपुरवठ्यावरील ताण कमी होईल, असं पालिकेचं म्हणणं आहे. त्यामुळे सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया (Recycling of sewage) करून त्याचा वापर करणाऱ्या सोसायट्यांना मालमत्ता करामध्ये (Property tax) ५ टक्के सवलत देण्यात येणार आहे.  सर्व नियमांचे पालन करणाऱ्या सोसायट्यांना मालमत्ता करात १५ टक्के सवलत मिळू शकेल, असं पालिकेनं म्हटलं आहे. 


मुंबई 
(mumbai) मध्ये रोज ९०० दशलक्ष लीटर पाणी गळती व चोरीमध्ये वाया जात आहे. मुंबईतील प्रत्येक घरात कपडे, भांडी, लादी, शौचालयात मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते.  ६० टक्के पिण्याचे पाणी पिण्याव्यतिरिक्त कामांवर वाया जात आहे. गाडी धुणे, उद्यानांमध्ये झाडांना पाणी देणे यात या पाण्याचा सर्वाधिक वापर होत आहे. या पाण्याची बचत केल्यास मुंबईकरांना पिण्याचे पाणी जास्त प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल. मोठ्या व्यापारी संकुलांमध्ये पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्याची सक्ती यापूर्वीच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केली आहे.
हेही वाचा -

मुंबईच्या वेशीवर लवकरच फास्टॅग यंत्रणा कार्यरत होणार

७३ वर्षाच्या म्हातारीलाही सुटेना जुगाचा नाद, अट्टल जुगारी ही थरथरा कापतात

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा