७३ वर्षाच्या म्हातारीलाही सुटेना जुगाराचा नाद, अट्टल जुगारीही थरथरा कापतात

तिच्या जुगार खेळण्याची पद्धत पाहून अट्टल सट्टेबाज ही तिला वचकून असतात. तिच्या या अचाट व्यसनाकडे बघून पोलिसही चक्रावून गेले आहेत.

७३ वर्षाच्या म्हातारीलाही सुटेना जुगाराचा नाद, अट्टल जुगारीही थरथरा कापतात
SHARES

म्हातारपण आलं की, बायका मुलबाळ-नातवांडामध्ये रमतात, पण गोरेगावमध्ये राहणाऱ्या एका ७३ वर्षांच्या म्हातारीला जुगाराचा इतका नाद जडला की, जुगार खेळण्यासाठी ती लोकांनाही लुबाडू लागली. तिच्या जुगार खेळण्याची पद्धत पाहून अट्टल सट्टेबाज ही तिला वचकून असतात. तिच्या या अचाट व्यसनाकडे बघून पोलिसही चक्रावून गेले आहेत. या म्हातारी विरोधात अंबोली पोलिस ठाण्यात असंख्य गुन्ह्यांची नोंद असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. 

हेही वाचाः- चालत्या लोकलमध्ये केला टायगर श्रॉफसारखा स्टंट, पोलिसांनी ठोकल्या बेड्या


गोवंडी परिसरात ७३ वर्षीय म्हातारी महिला कमरुनिसा शेख ही मुलासोबत राहते. मागील अनेक दिवसांपासून ती जोगेश्वरी परिसरात रहात असलल्या सुहासीनी कलगुटकर यांच्या आरे काॅलनीतील पेपर स्टॅालवर येत होती. शेख ही म्हातारी वारंवार येत असल्यामुळे कलगुटकरशी यांची तिच्याशी जवळीकता वाढली. मार्च २०१९ मध्ये लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू होती. ३ मार्च रोजी शेख ही कलगुटकर यांच्या स्टाॅलवर आली. त्यावेळी तिने कलगुटकरांना प्रिया दत्त यांच्या प्रचारफेरीत सहभागी होण्यासाठी आग्रह केला. त्यानुसार कलगुटर यांनी होकार दिला. त्यानुसार सायंकाळी शेख म्हातारी कलगुटकरची जोगेश्वरी रेल्वे स्टेशनबाहेर वाट पाहत होती. कलगुटकर आल्यानंतर शेख महिलेने भूक लागल्याची भासवून तिला जवळील एका हाॅटेलमध्ये नेले.

हेही वाचाः- मुंबईत येतंय पहिलं रो-रो जहाज

हाॅटेलमध्ये शेख म्हातारीने महिलेला ‘अरे तू ऐवढे दागिने का घातलेस, प्रिया दत्त त्या ठिकाणी गरीबांना साडी वाटणार आहे. तुला दागिन्यासोंबत पाहिले तर ती साडी देणार नाही. असे सांगून शेख महिलेने कलगुटक यांना जबरदस्ती ते लाखो रुपयांचे दागिने काढण्यास बाग पाडले. काढलेले दागिने शेखने स्वतःजवळ सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन ही दिले.  नाश्ता केल्यानंतर शेख महिलेने तिला हाॅटेलमधील पाणी पिऊ नकोस ते खराब असते, मी आणले ते पाणी पी असे सांगून पाणी पिण्यास दिले. पाणी पिल्यानंतर कलगुटर यांना अस्वस्थ वाटू, हाॅटेलमधून बाहेर आल्यानंतर दोघी एका झाडाखाली बसल्यानंतर कलगुटकर यांचा डोळा लागल्याचे पाहून शेख महिलेने तेथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कलगुटर या अंबोली पोलिसात तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या, त्यावेळी अशा प्रकारे त्या महिलेने अनेकांना गंडवल्याचे पुढे आले. पोलिसांनी वाढत्या गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून तपासास सुरूवात केली. अखेर दहा महिन्यानंतर शेख म्हातारी पोलिसांच्या हाती लागली. पोलिस चौकशीत तिने फसवणूकीत मिळालेले दागिने विकून त्यातून तिने मोठमोठ्या ठिकाणी सट्टा, जुगार खेळल्याचे सांगितल्यानंतर  पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिने अशा प्रकारे आता पर्यंत किती जणांची फसवणूक केली आहे. त्याचा पोलिस शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

हेही वाचाः- Exclusive अंधेरीत कपड्यांच्या दुकानातील चेंजिग रुममध्ये छुपा कॅमेरा, टेलरला अटक

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा