Advertisement

मुंबईत येतंय पहिलं रो-रो जहाज

मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबागमधील मांडवा दरम्यानच्या रो-रो (रोल आॅन/रोल आॅफ) सेवेला (ro ro car ferry) येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरूवात होत आहे.

मुंबईत येतंय पहिलं रो-रो जहाज
SHARES

मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबागमधील मांडवा दरम्यानच्या रो-रो (रोल आॅन/रोल आॅफ) सेवेला (ro ro car ferry) येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरूवात होत आहे. ही सेवा पुरवणारं पहिलं रो-रो जहाज बुधवारी मुंबई बंदरात दाखल होत आहे. या रो-रो सेवेमुळे मुंबई ते अलिबाग (mumbai to alibaug) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा मिळणार आहे. 

मुंबईहून अलिबागला पोहोचण्यासाठी जलप्रवास हाच सोपा मार्ग आहे. गेटवे ते मांडवा, भाऊचा धक्का – रेवस अशा दोन मार्गांवर रोज प्रवास करणाऱ्या पर्यटकांना स्वत:चं वाहन घेऊन येणं शक्य  होत नाही. त्यामुळे मुंबई ते मांडवा (mumbai to mandwa) अशी रो-रो सेवा सुरू करण्याची मागणी मागील काही वर्षांपासून केली जात होती. 

हेही वाचा- मुंबईच्या वेशीवर आलंय फास्टॅग, लवकरच होणार कार्यरत 

केंद्र सरकारच्या सागरमाला (sagarmala project) प्रकल्पाअंतर्गत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या (mumbai port trust) नियंत्रणाखाली ही सेवा सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे (महाराष्ट्रक मेरीटाईम बोर्ड) मांडवा इथं जेट्टी आणि टर्मिनल बांधण्यात आलं आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता.  

मांडवा येथील रो-रो टर्मिनलमध्ये २१४ बाय १० मीटरची जेट्टी , ३० बाय ३० चा प्लॅटफॉर्म, २० बाय २२ मीटरचा तरंगता तराफा (फ्लोटिंग प्लांटून)  ३६० मीटर लाटरोधक भिंत (ब्रेकवॉटर ) व १०० बाय ११५  मीटर लांबीचा वाहन तळ बांधण्यात आला आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया (mumbai port trust chairman sanjay bhatia) यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रीसमधील 'एस्कॉयर शिपिंग' कंपनीनं या जहाजाची बांधणी केली आहे. मुंबई ते मांडवा दरम्यान रो-रो सेवा सुरू झाल्यास ४ तासांचं अंतर एका तासावर येणार आहे. रो-रो सेवेमुळं रस्त्यावरील वाहतूककोंडी टळून इंधन बचतीसोबत प्रदूषणही कमी होणार आहे. एकावेळी ५०० प्रवासी आणि १८० कार वाहून नेण्याची या रो-रो जहाजाची क्षमता आहे. सुरुवातीच्या टप्प्यात दर तीन तासांनी जहाजाच्या फेऱ्या होतील. कार वाहतुकीसाठी एका बाजूचं भाडं १ ते दीड हजार तर, प्रवाशांसाठी हेच भाडं प्रत्येकी २३५ रुपये असेल.

हेही वाचा- रेल्वेच्या होमगार्ड जवानांच्या संख्येत कपात

रायगड हा औद्योगिक जिल्हा असून पर्यटनच्या दृष्टीनेही महत्वाचा आहे. मुंबई ते मांडवा रो-रो  सेवा सुरू झाल्यावर मुंबईहून अलिबागला स्वत:चं वाहन घेऊन येणं शक्य होणार आहे. सध्या वाहन असलेल्या प्रवासी किंवा पर्यटकांना मुंबईला पनवेलमार्गे यावं लागतं. त्यांचा हा वळसा वाचणार आहे. याशिवाय मांडवा ते गेट वे दरम्यानची बोटसेवा बारमाही होवू शकेल. यामुळे केवळ अलिबाग किंवा मुरूडच नाही, तर तर संपूर्ण कोकणच्या पर्यटनाला चालना मिळू शकेल, असं म्हटलं जात आहे.  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा