रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वेच्या गृहरक्षक (होमगार्ड) जवानांच्या संख्येत कपात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मानधनासाठी पुरेसा निधी नसल्यानं गृहरक्षक (होमगार्ड) जवानांच्या संख्येत कपात केली जात आहे. त्यामुळं आता दीड हजार जवानांऐवजी अवघे ५०० गृहरक्षक जवान रेल्वे प्रवाशांची सुरक्षा सांभाळत आहेत. त्यामुळं लोहमार्ग पोलिसांवरील कामाचा ताणही वाढणार आहे.
मध्य रेल्वेचा उपनगरीय पसारा सीएसएमटी ते खोपोली, कसारा, पनवेल आणि पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते डहाणूपर्यंत आहे. या मार्गावरून दररोज लाखोंच्या संख्येने महिला प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाबरोबरच गृहरक्षक दलाच्या जवानांनाही तैनात करण्यात येते. १२ डब्यांच्या लोकलमधील ३ महिला डब्यात रात्री ८ वाजल्यापासून पहाटे ६ वाजेपर्यंत हे जवान तैनात असतात.
याखेरीज
स्थानकातील प्लॅटफॉर्म आणि
पादचारी पुलांवरील गर्दी
नियंत्रणासाठीही गृहरक्षक
जवानांची नेमणूक केली जाते.
पश्चिम
व मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर
यासाठी दीड हजार होमगार्ड
तैनात होते.
मात्र,
यापैकी
१ हजार जवानांना हटवण्यात
आले आहे.
त्यामुळे
अवघ्या ५०० गृहरक्षक जवानांवर
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची
भिस्त आहे.
महिला
डब्यात सुरक्षेसाठी याआधी
जवळपास ७०० ते ८०० गृहरक्षक
जवान लागत होते.
तर
उर्वरित प्लॅटफॉर्मवर तैनात
असत.
आता
५०० जवानांवरच जबाबदारी
आल्यानं याचं नियोजन करणाऱ्या
लोहमार्ग पोलिसांची तारांबळ
उडत आहे.
सरकारकडून होमगार्डच्या मानधनाकरिता आतापर्यंत १३६ कोटी रुपयांचे अनुदान मिळत होते. मात्र आतापर्यंत २३० कोटी रुपये खर्च झाले आहेत. सरकारकडे उर्वरित पैसे मागितले आहेत. अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. त्यांचे मानधन मिळावे यासाठी प्रयत्न करत असून सरकार यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. तसंच, निधी मिळाला की सुरक्षा पूर्ववत करण्यात येणार आहेत.
हेही वाचा -
विमानांनी केलं उलट दिशेनं उड्डाण, प्रवाशी आश्चर्यचकीत
Exclusive अंधेरीत कपड्यांच्या दुकानातील चेंजिग रुममध्ये छुपा कॅमेरा, टेलरला अटक