Advertisement

विमानांनी केलं उलट दिशेनं उड्डाण, प्रवाशी आश्चर्यचकीत

मुंबई विमानतळावर विमानांनी सोमवारी अचानक उलट दिशेनं उड्डाण सुरू केलं

विमानांनी केलं उलट दिशेनं उड्डाण, प्रवाशी आश्चर्यचकीत
SHARES

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) एक प्रवाशांना (Passengers) आश्चर्यचकीत करणारी घटना घडली. मुंबई विमानतळावर विमानांनी सोमवारी अचानक उलट दिशेनं उड्डाण सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. विमानं पूर्वेकडून पश्चिमेऐवजी (समुद्राच्या दिशेने) पश्चिमेकडून पूर्व दिशेनं उडली. दरम्यान, हवेची दिशा बदलल्यानं असं उलट दिशेनं उड्डाण त्यांनी केल्यातं समजतं. हवेची (Air) दिशा क्वचितच बदलते अशी माहिती मिळते.

सोमवारी सकाळच्या वेळी मुंबईच्या विमानतळावरील विमानांनी सुमारे अडीच तास उड्डाण व खाली उतरण्याची दिशा बदलली. विमानं उलट दिशेनं मार्गक्रमण झाली. सकाळी जवळपास ७.३० ते ९ दरम्यान विमानं समुद्र व जुहू चौपाटीवरून विलेपार्लेच्या दिशेनं खाली उतरत होती व घाटकोपरच्या डोक्यावरून हवेत झेपावत होती.

कोलकाता किंवा पूर्व दिशेनं जाणारी विमानं उड्डाणानंतर नवी मुंबईच्या डोक्यावरून मार्गस्थ झाली. तर दिल्ली किंवा उत्तरेच्या दिशेनं जाणारी विमानं ठाणे, भिवंडीच्या डोक्यावरून गेली. मुंबईच्या विमानतळावरून (Mumbai Airport) हवेत उड्डाण घेतलं की प्रवाशांना खाली अथांग सागर दिसतो. मात्र, सोमवारी सकाळी खाली इमारती दिसू लागल्यानं प्रवासी आश्चर्यचकीत झाले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) २ एकमेकांना छेदणाऱ्या धावपट्ट्या आहेत. यापैकी ०९-२७ ही घाटकोपर-विलेपार्ले/सांताक्रूझ धावपट्टी मुख्य असून तीच सर्वाधिक उपयोगात येते. या धावपट्टीवरून (Runway) दररोज ९०० हून अधिक विमानांची ये-जा असते. ही विमानं बहुतांश वेळा घाटकोपर (Ghatkopar) दिशेनं खाली उतरतात व विलेपार्ले (Vileparle) दिशेनं समुद्राच्या वरून हवेत झेपावतात.



हेही वाचा -

महापालिकेला लागले 'इंदूर पॅटर्न'चे वेध

अभिनेता टायगर श्रॉफ सारखं स्टंट करणं पडलं महागात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा