Advertisement

मुंबईच्या वेशीवर लवकरच फास्टॅग यंत्रणा कार्यरत होणार

मुंबईच्या वेशीवरील सर्व पथकर नाक्यांवर महिनाअखेपर्यंत 'फास्टॅग' यंत्रणा कार्यरत होणार आहे.

मुंबईच्या वेशीवर लवकरच फास्टॅग यंत्रणा कार्यरत होणार
SHARES

टोल नाक्यांवरील टोलवसुलीत पारदर्शकता यावी व टोल नाक्यावर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा कमी व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकारनं टोलवसूलीसाठी 'फास्टॅग' (Fastag) ही यंत्रणा बंधनकारक केली. त्यानुसार, या 'फास्टॅग' यंत्रणेची (Fastag System) अंमलबजावणी वांद्रे-वरळी सी लिंकच्या (Bandra-Worli Sea-Link) पाठोपाठ मुंबईच्या वेशीवरील सर्व पथकर नाक्यांवर महिनाअखेपर्यंत 'फास्टॅग' यंत्रणा कार्यरत होणार आहे. सध्या सर्व पथकर नाक्यांवरील वाहनांच्या संख्येनुसार मार्गिकांच्या चाचण्या सुरू असून, यानंतर ही सुविधा अमलात येणार आहे.

केंद्र सरकारनं (Central Government) फास्टॅग योजना बंधनकारक केल्यानंतर ही योजना केवळ राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) पथकर नाक्यांपुरतीच असल्याचं भूमिका मुंबईतील पथकर नाक्यांच्या व्यवस्थापनानं घेतली होती. मात्र, राज्य रस्ते विकास महामंडळानं (MSRDC) मुंबईच्या वेशीवरील सर्व पथकर नाक्यांना 'फास्टॅग' लागू करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले होते. त्यानंतर वांद्रे-वरळी सी-लिंकवर २४ जानेवारीपासून ६ मार्गिकांसाठी ही सुविधा लागू करण्यात आली.

गेल्या १५ दिवसांपासून मुंबईच्या सर्व ५ पथकर नाक्यांवर फास्टॅगच्या चाचण्या (Fastag Test) महामंडळातर्फे घेण्यात येत आहेत. कोणत्या मार्गिका फास्टॅगसाठी राखीव करता येतील, त्यामुळं वाहतूक कोंडी होणार नाही याच्या चाचण्या सुरू असून, महिनाअखेपर्यंत सर्व पथकर नाक्यांवर फास्टॅग सुविधा देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती मिळते.

मुंबईत प्रवेश करण्यासाठी दहिसर (पश्चिम द्रुतगती मार्ग), मुलुंड, ऐरोली (मुलुंड-ऐरोली मार्ग) आणि वाशी (शीव-पनवेल मार्ग) या ५ ठिकाणी पथकर नाके आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात नाक्यांवरील काही मार्गिकाच फास्टॅगसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत.हेही वाचा -

मुंबई भाजपला मिळणार नवा अध्यक्ष? 'या' नेत्यांची नावे चर्चेत

रेल्वेच्या होमगार्ड जवानांच्या संख्येत कपातसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा