रेल्वेत बनावट पास बनवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कोरोना काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही लोकलनं प्रवास कऱण्याची परवानगी नाही. असे असताना नागरिकांना बनावट क्यू आर कोडच्या माध्यमातून पास देणाऱ्या टोळीचा रेल्वे पोलिसांनी पर्दाफास केला आहे. अनिश राठोड असं या आरोपीचं नाव असून याप्रकरणी रेल्वे पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल प्रवासाची मुभा

अॅन्टोप हिलचा रहिवाशी असलेला अनिस राठोड मागील अनेक दिवसांपासून सामान्य नागरिकांना रेल्वेचा क्यू आर कोडपास काढून देत होता. हे क्यू आर कोड तयार करून देण्याच्या बदल्यात जवळपास ५०० ते १००० रुपये उकळण्याचं काम तो करत होता. दरम्यान वडाळा रेल्वे पोलिसांनी दोन प्रवाशांना खोट्या क्यू आर कोडच्या पासावर संशय आल्याने निरखून पास पाहिला. त्यावेळी तो पास खोटा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी त्या दोन प्रवाशांवर गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. तपासात अनिलचे नाव पुढे आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली.  वडाळा पोलिसांनी अनिस राठोडला गाठून त्याच्या घराची झडती घेतली. त्याच्यासह घरातील साहित्य ताब्यात घेण्यात आलं. ज्या लोकांना त्याने क्यू आर कोड तयार करून दिला ते सगळे छोट्या मोठ्या दुकानात काम करणारे कामगार होते.

हेही वाचाः- चेंबूरमध्ये मेट्रो ४ लाईनसाठी १८ झाडं तोडण्यास महापालिकेची परवानगी

कोरोनाचे संक्रमन पाहता सरकारने अत्यावश्यक सेवेतेली कर्मचाऱ्यांना प्रवासात मुभा दिली आहे. मात्र अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यां व्यतिरिक्त अन्य कोणी प्रवास करु नये म्हणून महाराष्ट्र सरकार ने क्यूआर कोड ही यंत्रणा सुरू केली. तसेच त्यांना क्यूआर कोडचे पासही देण्यात आलेले आहे. याचीचं संधी साधून भूरट्या चोरांनी खोटे क्यू आर कोड तयार करत पासचा काळाबाजार करण्यास सुरूवात केली. अनिस राठोड ने आता पर्यंत ४०० ते ५०० खोटे क्यूआर कोड तयार करून लोकांना दिले असल्याची माहिती समोर आली आहे

पुढील बातमी
इतर बातम्या