Advertisement

मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल प्रवासाची मुभा


मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल प्रवासाची मुभा
SHARES

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यातच आता राज्य सरकारनं मुंबईच्या डबेवाल्यांना ही प्रवासाची मुभा दिली आहे. मुंबईतील डबेवाल्यांना आर्थिक प्रश्नांसह अनेक समस्यांना सामोर जावं लागत आहे. त्यामुळ राज्य सरकारनं लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्याची मागणी केली जात होती. अखेर ऑक्टोबरमध्ये डबेवाल्यांना परवानगी देण्यात आली आहे.

राज्य सरकारनं लॉकडाउनमध्ये आणखी शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला असून, अनेक गोष्टींवरील निर्बंध हटवले आहेत. मागील अनेक दिवसांपासून उपस्थित होत असलेल्या डबेवालांच्या मागणीवरही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील लोकल रेल्वेगाड्यांमधून डबेवाल्यांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मात्र, त्यासाठी डबेवाल्यांना क्यूआर कोड दिला जाणार आहे. हा कोड मिळाल्यानंतरच डबेवाल्यांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाकडून हे क्यूआर कोड दिले जाणार आहेत.

Read this story in English
संबंधित विषय