Advertisement

चेंबूरमध्ये मेट्रो ४ लाईनसाठी १८ झाडं तोडण्यास महापालिकेची परवानगी

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) आगामी मेट्रो ४ लाइनसाठी १८ झाडे तोडल्याची परवानगी दिली आहे.

चेंबूरमध्ये मेट्रो ४ लाईनसाठी १८ झाडं तोडण्यास महापालिकेची परवानगी
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) आगामी मेट्रो ४ लाइनसाठी १८ झाडे तोडल्याची परवानगी दिली आहे. या निर्णयाला पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी मान्यता दिली.

पालिकेच्या एम वेस्ट वॉर्डात असलेल्या गरोडिया नगर आणि सूर्यानगर दरम्यान झाडे तोडली जातील, असं प्रशासनानं म्हटलं आहे. याव्यतिरिक्त, सहा वृक्षांचं पुर्नरोपण केले जाईल. तर चार झाडं त्याच परिसरातील दुसऱ्या ठिकाणी पुर्नरोपण केलं जाईल, हे देखील प्रशासनानं स्पष्ट केलं.

मेट्रोसाठी केलेल्या कामांच्या अनुषंगानं कार्यकर्ते झोरू भठेना यांनी मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (एमएमआरडीए)ला मेट्रो २ एचा भाग म्हणून झाडे पुनरोपण करण्यास सांगितलं आहे.

“मुंबईत जेव्हा मेट्रो स्थानके बांधकामासाठी घेतली जातात तेव्हा पदपथावरील झाडे तोडली जातील. यामुळे मोठे नुकसान होईल. प्रशासन माहिती लपवण्याचा प्रयत्न करत आहे. पण प्रशासनानं पारदर्शकता ठेवली तर झाडं वाचवण्यास मदत होईल.”असं झोरूनं सांगितलं.

ठाणे इथं मेट्रो ४ लाईन बांधण्यासाठी आतापर्यंत एकूण १ हजार ०२३ झाडं तोडण्यात आली आहेत. अतिरिक्त ४५० झाडं तोडण्याचा प्रस्ताव नुकताच ठेवण्यात आला. दरम्यान, २०१९ मध्ये पालिकेनं १ हजार ४०० झाडे तोडण्यासाठी नोटीस पाठवल्या असल्या तरी आधीच्या अहवालात ४ हजार ५७७ झाडं तोडण्याचा प्रस्ताव होता.



हेही वाचा

आरे : मेट्रो कारशेड कंत्राटदारानं गाशा गुंडाळला

आरेतील ८०० एकर जागेत होणार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा