Advertisement

आरे : मेट्रो कारशेड कंत्राटदारानं गाशा गुंडाळला

प्रस्तावित कारशेडसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) नं घेतलेल्या एका कंत्राटदारानं या क्षेत्रातून बांधकाम उपकरणं स्थलांतरीत करण्यास सुरवात केली आहे.

आरे : मेट्रो कारशेड कंत्राटदारानं गाशा गुंडाळला
SHARES

गेल्या वर्षीच्या अखेरीस आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडचं काम थांबवण्यात आलं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य सरकार आता या क्षेत्रावरील कारशेडच्या बांधकामासाठी लागणारी उपकरणं हटवत आहेत. 

प्रस्तावित कारशेडसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) नं घेतलेल्या एका कंत्राटदारानं या क्षेत्रातून बांधकाम उपकरणं स्थलांतरीत करण्यास सुरवात केली आहे.

एमएमआरसीएलचे प्रकल्प संचालक एस के गुप्ता म्हणाले की, “आता कोणतीही नवीन कामं केली जात नाहीत. आम्ही फक्त साहित्य काढून टाकत आहोत. आम्ही काम थांबवलं, परंतु कंत्राटदारानं आणलेली बरीच सामग्री आहे. ही आता दुसर्‍या साइटवर हलवली जात आहेत. ”

मूळ ठिकाणी कामाला सुरुवात झाली तेव्हा मजुरांची सख्या जास्त होती. पण आता लॉकडाऊनमुळे मजुरांची संख्या कमी झाली आहे. परंतु गुप्ता यांनी घटनास्थळावरून संपूर्ण सामग्री काढून टाकण्यासाठी अधिक मुदत देण्यास नकार दिला. मचान, शटरिंग, स्टील मजबुतीकरण आणि बांधकाम संबंधित मोडतोड यासारख्या वस्तू सध्या या प्रदेशातून काढल्या जात आहेत.

गेल्या वर्षी हा वाद उद्भवल्यापासून आरे संवर्धन गटाशी संबंधित कार्यकर्त्यांनी साइटवर लक्ष ठेवलं होतं. गेल्या आठवड्यापर्यंत साइटवर काम सुरू असल्याचा आरोप देखील काही नागरिकांनी केला होता. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारशेडसाठी पर्यायी जागा शोधण्यासाठी एक समिती नेमली. थोड्याच वेळानंतर, कांजूरमार्ग तसंच गोरेगाव (पश्चिम) मधील पहाडी या भागांना मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा म्हणून उभं केलं जाऊ शकतं. 

दरम्यान, ठाकरे म्हणाले आहेत की, आरे जंगलातील सुमारे ८०० एकर क्षेत्राला  जंगल म्हणून घोक्षित केलं आहे. Read this story in English
संबंधित विषय